फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये (Cricket World Cup 2011) गौतम गंभीरची (Gautam Gambhir) सेंच्युरी फक्त 3 रननं हुकली. गंभीर त्या फायनलमध्ये 97 रनवर आऊट झाला. गंभीरला 97 रनवर आऊट करणाऱ्या थिसारा परेरा (Thisara Perera) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. परेरानं वयाच्या 32 व्या वर्षीच रिटायरमेंट जाहीर केली आहे.

वन-डे आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक करणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये थिसारा परेरा याचा समावेश होतो. परेरानं 6 टेस्टमध्ये 203 रन्स आणि 11 विकेट्स, 166 वन-डे मध्ये 2338 रन आणि 175 विकेट्स, आणि 84 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 1204 रन्स आणि 51 विकेट्स घेतल्या. वन-डे क्रिकेटमध्ये 2 हजार पेक्षा जास्त रन करणाऱ्या बॅट्समनच्या स्ट्राईक रेटचा विचार केला तर परेराचा या यादीमध्ये चौथा क्रमांक आहे. त्यानं वन-डे कारकिर्दीमध्ये 112.08 च्या स्ट्राईक रेटनं रन केले. परेरानं वयाच्या 20 वर्षी म्हणजेच 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बॉलिंग ऑलराऊंडर असलेल्या परेरारानं लोअर ऑर्डरमध्ये काही चांगल्या खेळी केल्या. पण त्याला वन-डे क्रिकेटमधील पहिल्या सेंच्युरीसाठी 10 वर्ष वाट पाहावी लागली.

अविस्मरणीय सेंच्युरी

न्यूझीलंडविरुद्ध 5 जानेवारी 2019 रोजी झालेल्या वन-डे मध्ये 320 रनचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवस्था 7 आऊट 128  अशी झाली होती. अवघ्या 16 रनमध्ये श्रीलंकेचे पाच बॅट्समन आऊट झाले होते. मोठ्या पराभवाच्या दिशेने श्रीलंकेची वाटचाल सुरु होती. त्यावेळी परेरारानं प्रतिहल्ला केला.

परेरानं फक्त 57 बॉलमध्ये त्याची पहिली आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावली. या मॅचमध्ये त्याने फक्त 74 बॉलमध्ये 8 फोर आणि 13 सिक्ससह 140 रन काढले. एकाच वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेकडून सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड सनथ जयसुर्याच्या नावावर होता. 1996 साली झालेल्या सिंगर कपमध्ये जयसुर्याने 11 सिक्स मारले होते. परेरारानं तो रेकॉर्ड देखील मोडला.

परेराची ही आतषबाजी श्रीलंकेला विजय मिळवून देऊ शकली नाही. तो 140 रनवर आऊट झाला. शेवटची जोडी मैदानात असताना मॅट हेन्रीचा बॉल फटकावण्याचा त्याचा प्रयत्न फसला. ट्रेंट बोल्टनं त्याचा कॅच घेतला. श्रीलंकेनं ती मॅच 21 रननं गमावली. पण पराभव वाट्याला आलेली एक सर्वोत्तम इनिंग परेरा (Thisara Perera) त्या दिवशी खेळला होता.

वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब

परेराच्या 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये त्याने काही चांगल्या इनिंग देखील खेळल्या आहेत. 2014 च्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कुमार संगकरासोबत नाबाद पार्टरनरशिप करत परेरानं श्रीलंकेला त्याने वर्ल्ड कप जिंकून दिला. 2007 पासून आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद श्रीलंकेला हुलकावणी देत होते, त्या विजतेपदावर परेराच्याच विजयी फटक्यानं श्रीलंकेनं शिक्कामोर्तब केले होते.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : वटवृक्षाची सावली आधारवड होते तेंव्हा… )

आयपीएल स्पर्धेतही चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरळा, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशा वेगवेगळ्या टीमकडून परेरा खेळला आहे. बॉलिंग ऑल राऊंडर म्हणून परेरानं या टीमकडून उपयुक्त कामगिरी केली आहे.

सहा बॉलवर सहा सिक्स!

एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स मारणारा थिसारा परेरा (Thisara Perera) हा एकमेव श्रीलंकन खेळाडू आहे. त्यानं मार्च महिन्यात श्रीलंकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: