फोटो – ट्विटर, आयसीसी

तो बॅटींगला आला तेव्हा श्रीलंकेकडं फक्त 23 रनची आघाडी होती. त्यांचे कॅप्टनसह 3 प्रमुख बॅटर आऊट झाले होते. टेस्ट मॅचचा चौथा दिवस असल्यानं पिच बॅटींगसाठी सोपं नव्हतं. तरीही तो निग्रहानं उभा राहिला. 10 दिवसांपूर्वीच तो हास्यास्पद पद्धतीनं Hit Wicket झाला होता. पण त्यानं या मॅचमध्ये Superhit Cricket खेळत श्रीलंकेला अडचणीतून बाहेर काढलं. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) यांच्यात गॉलमध्ये टेस्ट मॅच सुरु आहे. या टेस्टच्या चौथ्या दिवशी धनंजय डिसिल्वा श्रीलंकेसाठी संकटमोचक बनला. त्यानं चौथ्या दिवसाच्या अखेर नाबाद सेंच्युरी (Dhananjaya de Silva Century) झळकावली.

संकटात सुरूवात

गॉल टेस्टमध्ये श्रीलंकेनं पहिल्या इनिंगमध्ये 204 रन केले. त्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 253 रनवर ऑल आऊट झाली. श्रीलंकेच्या दुसऱ्या इनिंगची सुरूवात खराब झाली. कॅप्टन करुणारत्नेसह त्यांचे 3 बॅटर फार रन करू शकले नाहीत. श्रीलंकेचा स्कोअर 3 आऊट 73 असा होता तेव्हा डिसिल्वा बॅटींगला आला. त्यावेळी वेस्ट इंडिजची परिस्थिती वरचढ होती.

डिसिल्वानं पाथूम निसांकासोबत चौथ्या विकेट्ससाठी 78 रनची पार्टनरशिप केली. निसांकानं पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. तो 66 रनवर आऊट झाला. त्यानंतरही डिसल्वाचा धडाका (Dhananjaya de Silva Century) सुरू होता.

शून्यातून विश्व निर्माण करता येतं त्यानं 5 शून्य पचवून केलं!

श्रीलंकेकडे भक्कम आघाडी

डिसल्वानं त्यानंतर श्रीलंकेच्या प्रत्येक बॅटरला हाताशी धरत टीमचा स्कोअर वाढवला. त्यानं रमेश मेंडिससोबत 6 व्या विकेट्ससाठी 51 रनची पार्टनरशिप केली. वेस्ट इंडिजच्या स्पिनर्सनी श्रीलंकेला धक्के दिले. श्रीलंकेची अवस्था 8 आऊट 221 अशी झाली होती. धनंजय डिसिल्वानं 10 व्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या लसिथ एम्बुलडेनियासोबत शतकी पार्टनरशिप केली. त्यांच्या पार्टनरशिपमुळे चौथ्या दिवसाच्या अखेरीस श्रीलंकेचा स्कोअर 8 आऊट 328 असा झाला आहे. आता वेस्ट इंडिजकडे 279 रनची भक्कम आघाडी आहे.

डिसिल्वानं यावेळी त्याच्या टेस्ट करिअरमधील आठवी सेंच्युरी 189 बॉलमध्ये पूर्ण केली. तो चौथ्या दिवसाच्या अखेरीस 153 रन काढून नॉट आऊट आहे. त्यानं या खेळीत 11 फोर आणि 2 सिक्स लगावले. डिसल्वाची या वर्षातील ही दुसरी टेस्ट सेंच्युरी आहे. त्यानं यापूर्वी बांगलादेश विरूद्ध सेंच्युरी (Dhananjaya de Silva Century) झळकावली आहे.

Hit Wicket मुळे थट्टा

डिसिल्वासाठी ही सेंच्युरी दोन कारणांसाठी खास आहे. पहिलं कारण म्हणजे त्यानं अवघड परिस्थितीमध्ये ही सेंच्युरी झळकावत (Dhananjaya de Silva Century) श्रीलंकेला विजयाचा मार्ग दाखवला आहे. त्याचबरोबर तो वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विचित्र पद्धतीनं हिट विकेट (Hit Wicket) झाल्यानं सर्वांचा थट्टेचा विषय बनला होता.

पहिल्या टेस्टमध्ये डिसिल्वानं 61 रनची खेळी केली होती. तो संपूर्ण रंगात होता. त्यावेळी ग्रॅबियलच्या बॉलवर त्याला नीट फटका मारता आला नाही. तो बॉल स्टंपच्या दिशेनं जात होता. स्टंपकडे जाणारा बॉल त्यानं पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या बॅटला बॉल लागला नाही, तर त्याची बॅट स्टंपला लागली आणि तो हिट विकेट झाला. विशेष म्हणजे डिसिल्वा टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर दोनवेळा हिट विकेट झाला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.