फोटो – क्रिकेट ऑस्ट्रेलिया

टेस्ट क्रिकेट (Test Cricket) खेळण्याच्या स्वरुपावरुन ऑस्ट्रेलियातील दोन दिग्गज खेळाडूंचे परस्पर विरोधी विचार समोर आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने (Shane Warne) काही दिवसांपूर्वी गुलाबी बॉलने (Pink Ball) टेस्ट क्रिकेट खेळण्याची मागणी केली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्हन स्मिथला (Steve Smith) मात्र तसे वाटत नाही. टेस्ट क्रिकेट लाल बॉलमध्येच खेळलं जावं असं मत त्याने व्यक्त केले आहे.

शेन वॉर्न काय म्हणाला होता?

सध्या फक्त डे-नाईट टेस्टमध्ये गुलाबी बॉलचा वापर होतो. दिवसा होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये लाल बॉल वापरला जातो. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये पहिली टेस्ट ही डे-नाईट होती. त्यामुळे त्या टेस्टमध्ये  गुलाबी बॉलचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी शेन वॉर्नने यापुढे टेस्ट क्रिकेटमध्ये गुलाबी बॉलचा वापर नियमित करावा अशी मागणी केली होती. 25 व्या ओव्हरनंतर लाल बॉलमध्ये कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे आता लाल ऐवजी गुलाबी बॉलचा वापर सुरु करावा अशी मागणी वॉर्नने केली होती. गुलाबी बॉल दिसायला सोपा असतो, त्यामुळे टीव्हीवर मॅच पाहणारे प्रेक्षक देखील तो पाहू शकतात, असेही वॉर्नने म्हंटले होते.

( वाचा : कॅप्टनसीच्या प्रश्नावर स्मिथ म्हणाला… )

स्मिथचे मत काय आहे?

शेन वॉर्नच्या या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना स्मिथ म्हणाला की, “मला स्वत:ला लाल बॉल क्रिकेट जिवंत ठेवायला आवडेल. सीरिजमधील एखादी मॅच गुलाबी बॉलमध्ये खेळणं ठीक आहे. आपण ते अ‍ॅडलेडमध्ये पाहिलं, तो एक चांगला अनुभव होता, असे सांगत स्मिथने पारंपारिक लाल बॉलने क्रिकेट खेळण्यास पहिलं प्राधान्य दिले आहे.

( वाचा : क्रिकेटमधील मोजकेच दिवस शिल्लक असल्याची डेव्हिड वॉर्नरची कबुली! )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: