फोटो – ट्विटर

या आयपीएलमध्ये (IPL 2021) पहिला विजय मिळण्यासाठी चौथ्या मॅचची प्रतीक्षा करावी लागणाऱ्या सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) धक्कादायक बातमी आहे. त्यांचा प्रमुख बॉलर असलेला टी. नटराजन (T. Natarajan) उर्वरित स्पर्धेतून आऊट झाला आहे. नटारजनच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्यामुळे त्या उरलेली स्पर्धा खेळता येणार नाही. (Natarajan out from IPL 2021)

नटराजन या आयपीएलमध्ये फक्त दोनच मॅच खेळला आहे. तो कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शेवटची मॅच खेळला होता. त्यानंतर सनरायझर्सच्या मागच्या दोन मॅच तो खेळू शकला नव्हता. त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नटराजन सध्या सनरायझर्सच्या टीम सोबत चेन्नईत आहे. त्याला बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये जावं लागेल. ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर नटराजन दोन महिने NCA मध्येच होता. तसंच तो दुखापतीमुळे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मर्यादीत ओव्हर्सच्या मालिकेतील सुरुवातीच्या मॅच खेळू शकला नव्हता.

सनरायझर्सला मोठा धक्का

टी. नटराजननं मागील आयपीएलमध्ये जोरदार कामगिरी केली होती. त्यानं मागच्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) त्यानं 16 मॅचमध्ये 8.02 च्या इकॉनॉमी रेटनं 16 विकेट्स घेतल्या होत्या. मॅचच्या डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर्स टाकण्याच्या नटराजनच्या क्षमतेनं सर्वजण प्रभावित झाले होते. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्या अनुपस्थितीमध्ये नटराजननं डेथ ओव्हर्सची जबाबदारी उत्तम पद्धतीनं सांभाळली होती.

मागील आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे नटराजनची भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रथम नेट बॉलर म्हणून निवड झाली होती. त्या दौऱ्यात प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं नटराजनला वन-डे, T20 आणि टेस्ट या तिन्ही प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली. एकाच दौऱ्यात क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारा नटराजन हा टीम इंडियाचा पहिलाच खेळाडू आहे. नटराजन या स्पर्धेतून आऊट झाल्यानं (Natarajan out from IPL 2021) सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलिया गाजवलेल्या टी. नटराजनचं गावात राजेशाही स्वागत, पाहा VIDEO

नटराजनच्या जागी कोण खेळणार?

नटराजनच्या अनुपस्थितीमध्ये खलील अहमद (Khaleel Ahmed) मागील दोन मॅच खेळला होता. खलिलनं या दोन मॅचमध्ये 4 विकेट्स घेत समाधानकारक कामगिरी केली आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ कौल आणि बसील थप्पी हे अन्य दोन फास्ट बॉलर्स देखील सनरायझर्सकडं आहेत. नटराजन आयपीएलमधून आऊट झाल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर (Natarajan out from IPL 2021) त्याच्या जागी बदली खेळाडूचा देखील सनरायझर्सच्या टीममध्ये समावेश होऊ शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: