फोटो – ट्विटर

T20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राहुल द्रविड (Rahul Dravid) आता टीम इंडियाचा कोच झाला आहे. तर विराट कोहलीनंही (Virat Kohli) T20 टीमची कॅप्टनसी सोडली आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2022) तयारी भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) T20 सीरिजपासून सुरू होणार आहे. मुंबईचा बॅटर पृथ्वी शॉ ने 83 रनची आक्रमक खेळी (Prithvi Shaw 83) करत टीम इंडियातील त्याची दावेदारी सादर केली आहे.

6 फोर आणि 4 सिक्सची फटकेबाजी!

पृथ्वी शॉने त्याच्या 22 वाढदिवशी (9 नोव्हेंबर) ही फटकेबाजी केली. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Sayed Mushtaq Ali Trophy 2021)  बडोद्याविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं 63 बॉलमध्ये 83 रन काढले. या खेळीत त्यानं 6 फोर आणि 4 सिक्सची फटकेबाजी केली. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या ओपनिंग जोडीनं पहिल्या विकेटसाठी 151 रनची दमदार भागिदारी केली. कॅप्टन रहाणे 45 बॉलमध्ये 71 रन काढून आऊट झाला. त्यानंतरही पृथ्वीनं फटकेबाजी (Prithvi Shaw 83) सुरूच ठेवली.

मुंबईकडून शिवम दुबेनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी केली. त्यानं फक्त 9 बॉलमध्ये नाबाद 23 रन काढाले. या सर्वांच्या प्रयत्नानं मुंबईनं 20 ओव्हर्समध्ये 2 आऊट 193 रन काढले. कृणाल पांड्याच्या (Krunal Pandya) कॅप्टनसीखाली खेळणाऱ्या बडोद्याला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 111 रन काढले. त्यामुळे मुंबईनं 82 रननं ही मॅच जिंकली. मुंबईकडून तनूश कोट्याननं सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या.

दोन्ही हातानं बॉलिंग करू शकणाऱ्या मराठी बॉलरनं केला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व ओव्हर्स टाकल्या मेडन!

पृथ्वी साठी लाख मोलाची इनिंग

न्यूझीलंड विरुद्धच्या T20 टीममध्ये जागा मिळवण्यासाठी पृथ्वी शॉ साठी ही सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा मोलाची आहे. पहिल्या 4 मॅचमध्ये पृथ्वी सपशेल अपयशी ठरला होता. त्यानं 4 इनिंगमध्ये फक्त 24 रन काढले होते. यामध्ये 14 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. बडोदापूर्वी छत्तीसगड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये तर तो शून्यावर आऊट झाला होता.

या सर्व परिस्थितीमध्ये वाढदिवशी आणि टीमच्या निवडीच्या तोंडावर खेळलेली ही इनिंग पृथ्वी साठी लाख मोलाची आहे. आता त्याला निवड समितीकडून रिटर्न गिफ्टची (Prithvi Shaw 83) म्हणजेच टीममधील निवडची अपेक्षा असेल.  

5 दिवसांमध्ये बदललं पृथ्वी शॉ चं आयुष्य, तुम्हीही वाचा एका बदलाची गोष्ट!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: