
सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेत (Syed Mushtaq Ail Trophy) देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक गुणवान खेळाडू चांगली कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधत आहेत. विदर्भाच्या (Vidarbha) अक्षय कर्णवारनं (Akshay Karnawar) या स्पर्धेत 4 ओव्हर्स मेडन टाकत कमाल केली होती. आता त्यानंतर विर्दभाच्याच दर्शन नळकांडेनं चार बॉलवर 4 विकेट्स घेण्याची (Darshan Nalkande 4 Wickets) कामगिरी केली आहे.
4 बॉलमध्ये 4 विकेट्स
प्लेट विभागातून मुख्य फेरीत आलेल्या विदर्भाच्या टीमनं या सिझनमध्ये जोरदार कामगिरी करत सेमी फायनलपर्यंत धडक मारली. दिल्लीत झालेल्या सेमी फायनलमध्ये विदर्भाची लढत देशांतर्गत क्रिकेटमधील बलाढ्य टीम असलेल्या कर्नाटक विरुद्ध (Vidarbha vs Karnataka) झाली.
या मॅचमध्ये विदर्भाचा कॅप्टन अक्षय वाडककरनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. वाडकरनं सुरुवातीला रोहन कदमचा सोडलेला कॅच विदर्भाला चांगलाच महाग पडला. रोहननं कॅप्टन मनिष पांडे (Manish Pandey) सोबत पहिल्या विकेटसाठी 132 रनची पार्टनरशिप केली. रोहन (87) आणि पांडे (54) रन काढून आऊट झाले. ही जोडी परतल्यानंतर विदर्भाच्या बॉलर्सनी मॅचमध्ये पुनरागमन (Darshan Nalkande 4 Wickets) केलं.
टीम इंडियात झाला मोठा अन्याय, KKR नं संपूर्ण सिझन बाहेर बसवलं, 7 बॉलमध्ये 34 रन काढत दिलं उत्तर
दर्शननं टाकलेली शेवटची ओव्हर विदर्भाच्या बॉलिंगमधील हायलाईट ठरली. कर्नाटकच्या अनुभवी अनिरुद्ध जोशीनं पहिल्या बॉलवर एकही रन घेतला नाही. त्यानंतर दर्शननं अनिरुद्ध जोशी आणि बीआर शरतला आऊट केलं. त्यापाठोपाठ जगदीश सुचितला आऊट करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. तर लगेच बॉलवर अभिनव मनोहरला आऊट केलं.
एका ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेण्याच्या कर्नाटकच्या अभिमन्य मिथूनची बरोबरी दर्शन करेल असं वाटत होतं. पण ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विजयकुमारनं एक रन काढत त्याला बरोबरी करू दिली नाही. पण दर्शननं शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन देत 4 विकेट्स (Darshan Nalkande 4 Wickets) घेतल्या.
राहुल-कुंबळेला उत्तर
चांगला फास्ट बॉलर आणि उपयुक्त बॅटर अशी दर्शनची ओळख आहे. पदार्पणातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्यानं महाराष्ट्राविरुद्ध 30 बॉलमध्ये 56 रनची खेळी करत विदर्भाला अशक्य विजय मिळवून दिला होता T20 क्रिकेटसाठी उपयुक्त खेळाडू असलेल्या दर्शनला 2019 साली पंजाब किंग्ज इलेव्हन (Punkab Kings XI) टीमनं करारबद्ध केलं होतं.
गेल्या 3 वर्षात पंजाबच्या टीमनं अनेक खेळाडू बदलले. पण, दर्शन कायम होता. पंजाबकडून अनेक खेळाडू खेळले, पण दर्शनला एकही संधी मिळाली नाही. त्यांच्या टीमचं नाव बदलून पंजाब किंग्ज (Punjab Kings) झालं. तरीही आयपीएलमध्ये नाव कमावण्यासाठी दर्शनची प्रतीक्षा कायम आहे.
केएल राहुल (KL Rahul) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) ही कर्नाटकची जोडी पंजाबची कॅप्टन आणि हेड कोच आहे. कॅप्टन आणि कोचच्या टीम विरूद्धच त्यानं हा जोरदार खेळ (Darshan Nalkande 4 Wickets) केला आहे.
IPL 2021 PBKS : नाव बदललं, आता खेळ बदलण्याचं आव्हान!
कर्नाटकचा निसटता विजय
दर्शन नळकांडेच्या शेवटच्या ओव्हरनं प्रेरणा घेत विदर्भाच्या बॅटर्सनी 177 रनचा पाठलाग जिद्दीनं केला. पण, त्यांचे प्रयत्न अखेर कमी पडले. कर्नाटकनं 4 रननं निसटता विजय मिळवला. आता कर्नाटकची फायनलमध्ये लढत तामिळनाडूशी होणार आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या इतिहासात सलग तिसऱ्या वर्षी कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू (Karnataka vs Tamil Nadu) ही फायनल मॅच होणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.