फोटो – ट्विटर

क्रिकेट विश्वातील काही रेकॉर्ड असे असतात की जे कुणीही मोडू शकत नाहीत. त्याची फक्त बरोबरी केली जाऊ शकते. पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2007) युवराज सिंहनं (Yuvraj Singh) मारलेले एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स हा यापैकी एक रेकॉर्ड आहे. असा एक रेकॉर्ड अक्षय कर्णवार (Akshay Karnewar) या मराठमोळ्या खेळाडूनं रचला आहे. त्यानं सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत सर्व चार ओव्हर्स (All Overs Maiden) मेडन टाकल्या आहेत. पुरुषांच्या T20 क्रिकेटमधील हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. युवराज सिंहच्या रेकॉर्डप्रमाणेच याची भविष्यात फक्त बरोबरी केली जाऊ शकते. तो कधीही मोडला जाऊ शकत नाही.

कोणत्या मॅचमध्ये केला रेकॉर्ड?

विर्दभाकडून खेळणाऱ्या अक्षयनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत हा मणिपूर विरुद्धच्या मॅचमध्ये (Vidarbha vs Manipur) या मॅचमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यानं सर्व चारही ओव्हर्स मेडन टाकत 2 विकेट्स घेतल्या. या मॅचमध्ये त्याच्या बॉलिंगचं विश्लेषण होतं 4 ओव्हर्स 4 मेडन शून्य रन 4 विकेट्स. (4-4-0-2) प्लेट ग्रुपमधील या मॅचमध्ये विदर्भानं मणिपूचा 167 रननं दणदणीत पराभव केला.

अक्षयच्या पूर्वी विदर्भाच्या बॅटर्सनी मैदान गाजवलं. अर्थव तायडेनं 21 बॉलमध्ये 46, जितेश शर्मानं 31 बॉलमध्ये नाबाद 71 तर अपूर्व वानखेडेनं फक्त 16 बॉलमध्ये नाबाद 49 रनची आक्रमक खेळी केली. त्याच्या या फटकेबाजीमुळे विदर्भानं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 222 रन केले. मणिपूरचा किशन थोकचोम हा बॉलर चांगलाच महाग पडला. त्यानं 3 ओव्हर्समध्ये तब्बल 60 रन देत 1 विकेट घेतली.

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या अपयशाची 5 मुख्य कारणं

मणिपूरसमोर जिंकण्यासाठी 223 रनचं विशाल आव्हान होतं. त्यांना हे आव्हान पेलवलं नाही. त्याची संपूर्ण टीम 16.3 ओव्हर्समध्ये फक्त 55 रन काढून आऊट झाली. विदर्भाकडून अक्षय प्रमाणेच (All Overs Maiden) आदित्य ठाकरे आणि अर्थव तायडेनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

कोण आहे अक्षय कर्णवार?

जवळपास 6 फुट उंची असलेल्या अक्षयचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातला आहे. उजव्या हातानं ऑफ स्पिन बॉलिंग करणारा अक्षय डाव्या हातानंही चांगला थ्रो करतो हे त्याच्या शालेय कोचच्या सर्वप्रथम लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी त्याला उजव्या हाताप्रमाणेच डाव्या हातानंही बॉलिंग करण्यास प्रोत्साहन दिले. त्यानं 2015 साली विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

2016 साली तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या आयपीएल टीममध्ये निवड झाली होती. त्यानं आजवर 15 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 36 विकेट्स घेतल्या असून 1 सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरीसह 626 रन काढले आहेत. 37 ए श्रेणीच्या मॅचमध्ये त्याच्या नावावर 50 विकेट्स असून 4 हाफ सेंच्युरीसह 590 रन आहेत. 43 T20 मॅचमध्ये त्यानं 39 विकेट्स घेतल्या असून 397 रन काढले (All Overs Maiden) आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: