फोटो – बीसीसीआय, ट्विटर

फायनल मॅचमध्ये शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत टीमला चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न अनेक क्रिकेटपटूंचं असतं. तामिळनाडूच्या शाहरूख खाननं (Shahrukh Khan) ते प्रत्यक्षात केलं आहे. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेची (Syed Mushtaq Ali T20) फायनल तामिळनाडू आणि कर्नाटक (Tamil Nadu vs Karnataka) या टीममध्ये झाली. या मॅचमध्ये तामिळनाडूला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 रन हवे होते. त्यावेळी शाहरूखनं सिक्स लगावत तामिळनाडूला विजेतेपद मिळवून दिले. फायनलमधील आक्रमक खेळीमुळे शाहरूखला आगामी आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये (Shahrukh Khan IPL 2022) मोठी रक्कम मिळणार हे स्पष्ट झाले आहे.  

कोण आहे शाहरूख खान?

देशांतर्गत टी20 स्पर्धेतील आघाडीचा फिनिशर असलेल्या शाहरूखचा इथवरचा प्रवास साधा नव्हता. त्यानं यासाठी बराच संघर्ष केला आहे. निराशा देखील पचवलीय. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा सिनेमा रिलीज झाला, त्याचवर्षी म्हणजे 1995 साली शाहरूखचा जन्म झाला. त्याची आत्या अभिनेता शाहरूखची मोठी फॅन असल्यानं त्याचे शाहरूख हे नाव ठेवण्यात आले.  

शाहरूखच्या घरात क्रिकेटचं वातावरण आहे. त्याचे वडील आणि मोठ्या भावानं चेन्नई लीगमध्ये क्रिकेट खेळलं आहे. चेन्नईमध्ये 2012 साली झालेल्या एका स्पर्धेत बेस्ट ऑल राऊंडरचा पुरस्कार मिळवत शाहरूख खान (Shahrukh Khan IPL 2022) सर्वात प्रथम चर्चेत आला होता.  

शाहरूख खाननं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत तामिळनाडूला केलं चॅम्पियन, 4 बॉलमध्ये ठोकले 22 रन! VIDEO

शाहरूखचा संघर्ष

शाहरूखनं 2014 साली झालेल्या कूच बिहार ट्रॉफी स्पर्धेतील 8 इनिंममध्ये 624 रन काढले होते. त्यानंतरही त्याची त्यावर्षी झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) स्पर्धेत निवड झाली नव्हती. इतकंच नाही तर त्याची त्याच वर्षी तामिळनाडूच्या रणजी टीममध्ये निवड झाली. पण चार वर्ष त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नाही.

शाहरूख 2018 साली सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळला. त्यानं पहिल्याच मॅचमध्ये 8 बॉलमध्ये 21 रन काढले. पण, त्या स्पर्धेतील पुढील चारही मॅचमध्ये तो फेल गेला. 2018 साली केरळ विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं रणजी स्पर्धेत पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये त्यानं 92 रनची खेळी करत तामिळनाडूला संकटातून बाहेर काढलं आणि मॅच जिंकून दिली.

IPL मधील निराशा

शाहरूख खानला 2020 साली मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) ट्रायलसाठी बोलावले होते. त्या ट्रायलपूर्वी त्याला दुखापत झाली होती. त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला. तो मुंबई  इंडियन्सच्या निवड समितीला प्रभावित करू शकला नाही. 2020 साली झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याचे नाव पुकारले गेले त्यावेळी त्याच्या नावातील सारखेपणामुळे ऑक्शन हॉलमधील अनेक जण हसले होते. त्यावेळी त्याला एकाही टीमनं खरेदी केले नाही.

शाहरूखनं पुन्हा एकदा देशांतर्गत स्पर्धेत दमदार खेळ केला. त्यामुळे आयपीएल 2021 मधील ऑक्शनमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी टीममध्ये चढाओढ लागली. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) या टीममध्ये त्याला घेण्यासाठी मोठी चढाओढ रंगली अखेर 20 लाखाची बेस प्राईज असलेल्या शाहरूखला (Shahrukh Khan IPL 2022)  पंजाबने साडे पाच कोटींना करारबद्ध केले.  

कॅप्टनशी भांडून सोडली होती टीम, आता 6 सिक्ससह झळकावली हाफ सेंच्युरी!

कोटींची उड्डाणे घेण्यास सज्ज

शाहरूख खान पहिल्या आयपीएल सिझनमध्ये 11 मॅच खेळला. यामध्ये त्यानं 134.21 च्या स्ट्राईक रेटनं 153 रन काढले. 47 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. आता आयपीएल फायनलमधील त्याच्या आक्रमक 33 रनमुळे तो पुन्हा एकदा आगामी मेगा ऑक्शनमध्ये (Shahrukh Khan IPL 2022) कोटींची उड्डाणे घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: