फोटो – ट्विटर, आयसीसी

आयपीएल स्पर्धेच्या उत्तरार्धात (IPL 2021, Phase 2) मुंबई इंडियन्सचा सलग 3 मॅचमध्ये पराभव झाला आहे. मुंबईच्या मिडल ऑर्डरचं अपयश हे या पराभवाचं कारण आहे. मुंबई इंडियन्सच्या या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाची चिंता देखील वाढली आहे कारण या टीममधील सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांची पुढील महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) त्यांची निवड झाली आहे. त्यांची खराब कामगिरी पुढील स्पर्धेतही सुरू राहिली तर निवड समिती यापैकी एका खेळाडूला वगळून नव्या खेळाडूची निवड करु शकते. सूर्यकुमार आणि इशानच्या जागेसाठी 3 जणांमध्ये (Who Replace Ishan, Surya) चुरस आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याचं आगामी वर्ल्ड कपचं कन्फर्म तिकीट हुकलं. सहा महिने क्रिकेटपासून दूर असणाऱ्या श्रेयसनं आयपीएल स्पर्धेत यशस्वी पुनरागमन केलं आहे.

मॅचच्या मिडल ओव्हर्समध्ये चांगला खेळ करण्याची क्षमता श्रेयसकडं आहे. तसंच स्पिन बॉलर्सला चांगलं खेळण्याची त्याची क्षमता यूएईमधील पिचवर उपयोगी ठरणारी आहे. श्रेयसची वर्ल्ड कप टीममध्ये स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे टीममध्ये निवड करण्यास त्याला पहिले प्राधान्य (Who Replace Ishan, Surya) देण्यात येईल.

विराटनंतर RCB चा कॅप्टन कोण होणार? 3 जणांची नावं सर्वात आघाडीवर

शिखर धवन (Shikhar Dhawan)

आयपीएल स्पर्धेत सातत्यानं रन काढणाऱ्या शिखर धवनची वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. अनुभवी धवनच्या जागी निवड समितीनं टॉप ऑर्डरमध्ये इशान किशनला प्राधान्य दिलं. पण इशान किशनचा फॉर्म सध्या हरपला आहे.

इशानची खराब कामगिरी सुरू राहिली तर आयपीएलमध्ये सर्वाधिक रन काढण्यासाठी मिळणाऱ्या ऑरेंज कॅपचा दावेदार असलेल्या धवनचा निवड समिती विचार करु शकते. धवनचा अनुभव तसंच आयसीसी स्पर्धांमधील इतिहास त्याच्या निवडीसाठी मदत करणारा आहे. त्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून इशान किशननं त्याची घेतलेली जागा तो पुन्हा मिळवू शकतो.

संजू सॅमसन (Sanju Samson)

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कॅप्टन असलेल्या संजूच्या गुणवत्तेबाबत कुणालाही शंका नाही. पण, त्याच्या  सातत्यावर सर्वांचा आक्षेप आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संजूला मर्यादीत संधी मिळाली आहे, त्याचा फायदा घेण्यात तो आजवर अयशस्वी ठरला आहे.

राजस्थान रॉयल्सला शेवटच्या ओव्हरमध्ये सनसनाटी विजय मिळवून देणारा कार्तिक त्यागी कोण आहे?

या आयपीएलमध्ये संजू फॉर्मात असून तो सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये आहे. तो विकेट किपर-बॅट्समन असल्यानं इशान किशनसाठी योग्य रिप्लेसमेंट (Who Replace Ishan, Surya) ठरु शकतो. T20 वर्ल्ड कपसाठी बॅटींग ऑर्डरमध्ये त्याला एक रोल निश्चित करुन दिला तर जगातील कोणत्याही बॉलिंग ऑर्डरला फोडण्याची क्षमता संजूकडं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: