
ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2021) पडघम आता वाजू लागले आहेत. या वर्ल्ड कपसाठी गट निश्चित झाले आहेत. सर्व टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीसाठी जास्तीत जास्त लिमिटेड ओव्हर्सच्या मॅच खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. टीम इंडियाला या वर्ल्ड कपपूर्वी या प्रकारातील एकमेव संधी श्रीलंका दौऱ्यात आहे. श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या 3 वन-डे आणि 3 T20 मॅचमधून आगमी वर्ल्ड कपमधील 4 जागा (4 Slots For T20 World Cup) निवड समिती निश्चित करणार आहे.
अतिरिक्त ओपनर
आगामी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंग करणार असल्याचं विराट कोहलीनं (Virat Kohli) जाहीर केलं आहे. केएल राहुलचा (KL Rahul) विचार मिडल ऑर्डरसाठी करत असल्याचे संकेत टीम मॅनेजमेंटनं दिले आहेत. त्यामुळे एक अतिरिक्त ओपनिंग बॅट्समनची जागा वर्ल्ड कप टीममध्ये शिल्लक आहे.
या जागेसाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्यात जोरदार चुरस असेल. धवनची जानेवारी 2020 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सरासरी 28 असून स्ट्राईक रेट 120 आहे. हे दोन्ही आकडे चांगले करण्याचा धवनचा या दौऱ्यात प्रयत्न असेल. त्याने आयपीएल स्पर्धेतच (IPL 2021) याचे संकेत दिले आहेत. धवनचा ICC स्पर्धांमधील रेकॉर्ड चांगला आहे. या कामगिरीला श्रीलंकेतील कामगिरीची साथ मिळाल्यास त्याची वर्ल्ड कपमधील जागा निश्चित होईल.
धवनला त्याच्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) जोडीदार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सोबत स्पर्धा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पृथ्वीला टीम इंडियातून वगळण्यात आले. त्यानंतर पृथ्वी सातत्याने चांगली कामगिरी करतोय. अॅडलेड टेस्टनंतर पृथ्वी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. त्याला या सीरिजमधील सर्व 6 मॅच खेळण्याची संधी मिळणार असून तो यामध्ये काय कामगिरी (4 Slots For T20 World Cup) करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.
मिडल ऑर्डरमधील एक बॅट्समन
वर्तमान परिस्थितीमध्ये सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे तीन बॅट्समन वर्ल्ड कपसाठी निश्चित आहेत. या मिडल ऑर्डरमधील एक अतिरिक्त पर्याय म्हणून मनिष पांडे (Manish Pandey) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यात स्पर्धा आहे.
श्रेयस अय्यर दुखापातीमुळे फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावरही त्याची त्यामुळे निवड झालेली नाही. तरीही श्रेयस या शर्यतीमध्ये सध्या मनिषच्या पुढे आहे. मनिषला या स्पर्धेत यायचं असेल तर त्याला श्रीलंका दौरा ही शेवटची संधी आहे. या दौऱ्यात भरपूर रन आणि चांगला स्ट्राईक रेट या दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होण्याचं आव्हान (4 Slots For T20 World Cup) त्याच्यासमोर आहे.
विराट कोहलीच्या जुन्या सहकाऱ्यासाठी श्रीलंका सीरिज ही शेवटची संधी
एक विकेट किपर
T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) या विकेट किपरची जागा नक्की आहे. विकेट किपरच्या दुसऱ्या जागेसाठी संजू सॅमसन (Sanju Samsaon) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोघांमध्ये जोरदार चुरस आहे.
इशान किशन हा ओपनिंगचा देखील एक पर्याय आहे. तसंच इंग्लंड विरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र त्याच्यासाठी आयपीएल स्पर्धेचा पूर्वार्ध खराब गेला होता. तर दुसरिकडं गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियातील जागेच्या शर्यतीमध्ये असलेल्या संजू सॅमसनला (Sanju Samson) श्रीलंका दौरा ही चांगली संधी आहे. राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली संजूनं आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. तो नावारुपाला आला. आता श्रीलंका दौऱ्यात द्रविडच्या टिप्सचा त्याच्या करियरवर सकारात्मक परिणाम झाला तर तो T20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना (4 Slots For T20 World Cup) नक्की दिसेल.
T20 World Cup : सुपर 12 मध्ये मेगा मुकाबला, भारत-पाकिस्तानचा एकाच गटात समावेश
एक स्पिनर
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन स्पिनर त्यांच्या बॉलिंगसोबतच बॅटींगमधील उपयुक्ततेमुळे T20 वर्ल्ड़ कप खेळणार हे नक्की आहे. या दोघांच्या जोडीला तिसऱ्या जागेसाठी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन मिस्ट्री स्पिनर, कृणाल पांड्या हा ऑल राऊंडर तसेच युजवेंद्र चहल आणि राहुल चहर हे दोन लेग स्पिनर T20 वर्ल्ड कपसाठी शर्यतीमध्ये आहेत.
हे पाचही जण श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या 5 जणांमध्ये कुणाला किती संधी मिळते तसंच ते त्या संधीचा कसा वापर करतात यावर यापैकी कुणाची वर्ल्ड कपसाठी निवड होणार (4 Slots For T20 World Cup) हे ठरणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.