
यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्डकपचं (T20 World Cup 2021) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं (ICC) जाहीर केलं आहे. त्यानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी त्यांची टीम देखील जाहीर केली आहे. टीम इंडियाची घोषणा देखील लवकरच होणार आहे. भारतीय टीमची निवड करताना टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कारण, टीम इंडियातील प्रत्येक जागेसाठी अनेक दावेदार (Team India Probables) आहेत.
10 जणांची निवड नक्की
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली टीम इंडिया यंदा पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपमध्ये उतरणार आहे. कोहलीला कॅप्टन म्हणून आजवर एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये (WTC Final 2021) टीम इंडिया न्यूझीलंडकडून पराभूत झाली होती.
असं असलं तरी, भारतीय टीम या विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. गेल्या काही महिन्यात भारतीय क्रिकेपटूंनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे कॅप्टन विराट कोहली, कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि चेतन शर्मांच्या (Chetan Sharma) अध्यक्षतेखालील निवड समितीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. या टीममध्ये 10 जणांची जागा निश्चित आहे.
T20 वर्ल्ड कपच्या टीम इंडियामधील ‘या’ 4 जागांसाठी होणार श्रीलंका दौऱ्यातून निवड
ज्या 10 जणांची जागा निश्चित आहे, त्यामध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्मा ही कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनची जोडी असेल. मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल. विकेट किपरच्या जागेसाठी ऋषभ पंत. ऑल राऊंडर म्हणून हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा. स्पिनरच्या जागेसाठी युजवेंद्र चहल तर फास्ट बॉलर्स म्हणून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.
ही नावं निश्चित
ओपनिंग बॅट्समन | विराट कोहली, रोहित शर्मा |
मिडल ऑर्डर | सूर्यकुमार यादव, केएल राहुल |
विकेट किपर बॅट्समन | ऋषभ पंत |
ऑल राऊंडर | हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा |
स्पिनर | युजवेंद्र चहल |
फास्ट बॉलर | जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार |
5 जागांसाठी मोठी स्पर्धा
टीम इंडियामधील उर्वरित 5 जागांसाठी अनुभवी आणि तरुण खेळांडूमध्ये जोरदार स्पर्धा आहे. भारतीय टीमच्या बेंच स्ट्रेंथनं संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे उर्वरित 5 जागांसाठी मोठी स्पर्धा आहे. या 5 जागांसाठी तब्बल 18 जणांमध्ये स्पर्धा (Team India Probables) आहे.
अतिरिक्त ओपनिंग बॅट्समनच्या जागेसाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात स्पर्धा आहे. मिडल ऑर्डरच्या जागेसाठी श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे, अतिरिक्त विकेट किपर म्हणून इशान किशन आणि संजू सॅमसन, स्पिन बॉलिंग ऑल राऊंडरसाठी वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कृणाल पांड्या. फास्ट बॉलिंग ऑल राऊंडरसाठी शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर. स्पिन बॉलर म्हणून वरूण चक्रवर्ती, राहुल चहर आणि कुलदीप यादव. तर फास्ट बॉलर्सच्या जागेसाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, चेतन सकारिया आणि नवदीप सैनी यांच्यात स्पर्धा आहे.
यापैकी वॉशिंग्टन सुंदर सध्या फिट नसला तरी त्याची उपयुक्तता लक्षात घेता निवड समिती त्याचा समावेश करु शकते. या टीममध्ये 10ऑक्टोबरपर्यंत आयसीसीच्या परवानगीशिवाय बदल करता येऊ शकतो. त्यामुळे निवड समिती सुंदरबाबत विचार करु शकते. अर्थात सुंदरवर सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपचार सुरु आहेत. त्याचवर उपचार करणाऱ्या फिजिओंचा अहवाल त्याच्या निवडीसाठी सर्वात महत्त्वाचा असेल.
19 जणांमध्ये स्पर्धा
ओपनिंग बॅट्समन | शिखर धवन, पृथ्वी शॉ |
मिडल ऑर्डर | श्रेयस अय्यर, मनिष पांडे |
अतिरिक्त विकेट किपर बॅट्समन | इशान किशन, संजू सॅमसन |
स्पिन बॉलिंग ऑल राऊंडर | वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पांड्या |
फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर | शार्दुल ठाकूर, दीपक चहर |
स्पिन बॉलर | राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव |
फास्ट बॉलर | मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, चेतन सकारिया, नवदीप सैनी, नटराजन |
या सर्वांमधील 5 जणांना निवड समितीला या वर्ल्डकपसाठी (Team India Probables) निवडावे (Team India Probables) लागेल. तसंच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता काही जणांची स्टँडबाय म्हणून देखील निवड करण्यात येईल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.