
ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या T20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) काऊंटडाऊन सुरु झालं आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियातील अंतिम 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार चुरस आहे. टीम इंडियाच्या दोन टीम एकाच वेळी सध्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. प्रत्येक जागोसाठी निवड समितीसमोर पर्याय आहेत. त्यामध्ये टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील जागेसाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोन मुंबईकरांमध्ये (Suryakumar or Shreyas) जोरदार चुरस आहे.
सूर्या फॉर्मात
सूर्यकुमारला संधी उशीरा मिळाली. त्याला टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र आता ही संधी मिळाल्यानंतर त्याची गाडी सुसाट सुटली आहे. यावर्षी इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेत त्याने पदार्पण केले. या कामगिरीच्या जोरावर त्यानं श्रीलंका दौऱ्यात सहज जागा मिळवली. श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेत पदार्पण केले. पदार्पणाच्या मालिकेतच सूर्यानं ‘मॅन ऑफ द सीरिज’ चा पुरस्कार पटकावला.
सूर्यकुमारनं 2018 ते 2020 या काळातील प्रत्येक आयपीएल सिझनमध्ये 400 पेक्षा जास्त रन केले आहेत. आयपीएलचा हा सिझन अजून संपलेला नाही. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता या सिझनमध्येही 400 चा टप्पा ओलांडण्यासाठी सूर्याला फार कष्ट पडणार नाहीत. T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर त्याला फॉर्म गवसल्यानं आयपीएल नंतर लगेच होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास प्रबळ दावेदार आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम मॅनेजमेंटनं त्याची मागणी केली. मॅनेजमेंटचा सूर्यावरचा विश्वास वाढल्याचं हे उदाहरण आहे.
पहिल्याच मॅचमध्ये ‘सूर्य’कुमार ‘तळपला’, टीम इंडियासाठी ‘प्रकाश’मान कामगिरी!
सूर्याला श्रेयसंच आव्हान
सूर्यकुमारला प्लेईंग 11 मध्ये खेळण्यासाठी श्रेयस अय्यरचं आव्हान (Suryakumar or Shreyas) आहे. श्रेयसनं यावर्षी 4 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 121 रन काढले आहेत. यामध्ये त्याची सरासरी 40.33 असून स्ट्राईक रेट हा 145.78 आहे. श्रेयसनं हे सर्व रन बलाढ्य इंग्लंडच्या विरुद्ध काढले आहेत. त्यामुळे याचं जास्त महत्त्व आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये श्रेयसनं 48 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली. त्या मॅचमध्ये त्यानंतरचा टीम इंडियाच्या बॅट्समनचा सर्वोच्च स्कोअर हा 21 होता. चौथ्या T20 मध्ये सहाव्या क्रमांकावर बॅटींगला येत 18 बॉलमध्ये 37 रनची आक्रमक खेळी तो खेळला. मॅचच्या परिस्थितीप्रमाणे शांत आणि आक्रमक अशा दोन्ही पद्धतीची इनिंग खेळण्याचं कौशल्य श्रेयसकडं आहे.
दोघांमधील फरक?
सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर हे दोघेही (Suryakumar or Shreyas) मुंबईचे बॅट्समन आहेत. दोघांनीही बराच काळ एकत्र क्रिकेट खेळलंय. या दोघांच्या बॅटींगमधील मुख्य फरक म्हणजे श्रेयस अय्यर हा पारंपारिक बॅट्समन आहे. तो पहिल्या बॉलपासून बॉलर्सवर हल्ला करत नाही. सेटल होण्यासाठी आधी वेळ घेतो. सूर्यकुमारचं तसं नाही. तो पहिल्या बॉलपासूनच आक्रमक असतो. T20 क्रिकेटसाठी आवश्यक असलेली ही आक्रमकता सूर्यकुमारकडं आहे.
श्रेयससाठी दुसरी अडचणीची बाब म्हणजे तो गेल्या पाच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे दुखापतीनंतर तो क्रिकेटमध्ये कसं कमबॅक करतो, हे देखील पाहावं लागेल. सूर्यकुमार सातत्यानं खेळत आहे. मॅच प्रॅक्टीस ही त्याच्यासाठी वरचढ बाजू आहे.
T20 वर्ल्ड कपच्या टीम इंडियामधील ‘या’ 4 जागांसाठी होणार श्रीलंका दौऱ्यातून निवड
कधी होणार फैसला?
आयपीएलच्या 14 व्या सिझनचा (IPL 2021) दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. मागील सिझनमध्ये यूएईतच दिल्ली कॅपिटल्सचा (DC) फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पराभव केला. आता या सिझनमध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला (MI) विजेतेपद राखण्यासाठी सध्या पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा मोठा अडथळा पार करावा लागणार आहे.
आगामी आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्लीच्या दोन टीममधील लढतचीइतकीच या दोन टीमकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार आणि श्रेयसच्या लढतीकडंही सर्वांचं लक्ष असेल. आयपीएलमध्ये दोघांमध्ये सरस (Suryakumar or Shreyas) कोण खेळतो यावरच त्यानंतर लगेच यूएईमध्येच होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये कोण खेळणार? हे ठरणार आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.