फोटो – सोशल मीडिया

तामिळनाडूतल्या थंगरासू नटराजन (T. Natarajan) याच्या आयुष्यात 2020 हे वर्ष टर्निंग पॉईंट ठरलं आहे. नटराजनचे वडील ऐकेकाळी रोजंदारीवर काम करत. तर तो स्वत:  आईला चहाची टपरी चालवायला मदत करत असे. त्याच्या आयुष्यात बदल क्रिकेटमुळे झाला. सुरुवातीला तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) त्यानं गाजवली. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) अचूक यॉर्करनं क्रिकेट विश्वात स्वत:ची ओळख तयार केली.

50 दिवसांमध्ये बदललं नशीब

आयपीएल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Of Australia) नेट बॉलर म्हणून निवड झाली होती. टीममधील खेळाडू जखमी झाले आणि नटराजनला आधी वन-डे, नंतर टी-20 आणि शेवटी ब्रिस्बेनमध्ये टेस्ट क्रिकेट देखील खेळण्याची संधी मिळाली. एकाच दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अगदी कमी कालावधीमध्ये पदार्पण करण्याचा एक रेकॉर्ड नटराजननं केला.

नटराजननं त्याच्या अचूक यॉर्करनं मर्यादीत ओव्हर्सच्या मॅचमध्ये कमाल केली. त्यानं शेवटच्या वन-डेमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाच्या (Team India) विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर T20 सीरिजमध्ये सहा विकेट्स घेतल्या. टीम इंडियानं T20 सीरिज जिंकण्यात नवख्या नटराजनचा मोठा वाटा होता. त्यानंतर ब्रिस्बेन टेस्टपूर्वी (Brisbane Test) प्रमुख बॉलर्स जखमी झाल्यानं तो ब्रिस्बेन टेस्टही खेळला. पहिल्याच टेस्टमध्ये त्यानं 3 विकेट्स घेतल्या.

( वाचा : उथळपणाचा शिक्का बसलेला हार्दिक पांड्या ठरला ‘बडा दिलवाला’!)

गावी राजेशाही स्वागत

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून परलेल्या नटराजनच्या स्वागताला त्याचं सर्व गाव लोटलं होतं. तामिळनाडूमधील (Tamil Nadu) सेलमजवळचं (Salem) चिन्नापम्पट्टी (Chinnappampatti ) हे नटराजनचं गाव. या गावात नटराजनचं अगदी राजेशाही स्वागत करण्यात आलं.

नटराजनची एका रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्याला रथामधूनच घरी नेण्यात आलं. आपल्या गावाच्या पोराला पाहण्यासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले होते. तामिळमधून सर्वत्र त्याच्या नावाचा जयजयकार सुरु होता. रथावर बसलेल्या नटराजननं सर्वांच्या स्वागताचा स्विकार केला.

नटराजनचं स्वागत पाहून सेहवाग म्हणाला

टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागनं नटराजनच्या स्वागताचा व्हिडीओ शेअर केला आहे. “स्वागत नही करोगे हमारा? ‘या फिल्मी डायलॉगनं सेहवागनं त्याच्या ट्विट्सची सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ‘हा भारत आहे. इथे क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर त्यापेक्षाही बरंच काही आहे. सेलम जिल्ह्यातल्या चिन्नापम्पट्टी गावात नटराजनचं जोरदार स्वागत. काय स्टोरी आहे,’ असं ट्विट केलं आहे.

नटराजनला विश्रांती

नटराजनला पहिल्या दोन टेस्टसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2020) सुरु असतानाच नटराजनला मुलगी झाली होती. नटराजननं अजून मुलीचा चेहरा प्रत्यक्ष पाहिलेला नाही. आता या ब्रेकमध्ये त्याला मुलीच्या सहवासाचा आनंद घेता येणार आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: