फोटो – सोशल मीडिया

गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट फॅन्सना ज्याची उत्सुकता होती, ते T20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक (T20 WC 2021 Schedule) अखेर जाहीर झालं आहे. ही स्पर्धा यापूर्वी भारतामध्ये होणार होती. पण भारतामधील कोरोनाच्या परिस्थितीमुळे अखेर यूएई आणि ओमान या देशात हा वर्ल्ड कप होणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) या मॅचनं वर्ल्ड कपची सुरूवात होईल.

पात्रता फेरीतून येणार 4 टीम

मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पात्रता फेरी होईल. त्यामधून 4 टीम स्पर्धेसाठी पात्र होतील. पात्रता फेरीतील ग्रुप A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड आणि नामिबीया हे चार देश असतील. तर ग्रुप B मध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पीएनजी आणि यजमान ओमान या चार टीमचा समावेश आहे. या दोन्ही ग्रुपमधील टॉप 2 टीम मुख्य स्पर्धेसाठी पात्र होतील.

गतविजेत्या वेस्ट इंडिजसह भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या 8 टीम या वर्ल्ड कपसाठी थेट पात्र झाल्या आहेत. या 8 आणि पात्रता फेरीतील 4 अशा 12 टीममध्ये मुख्य वर्ल्ड कपची स्पर्धा वेळापत्रक (T20 WC 2021 Schedule) रंगेल.

सुपर 12 मध्ये मेगा मुकाबला, भारत-पाकिस्तानचा एकाच गटात समावेश

टीम इंडियाचे वेळापत्रक

टीम इंडियाचे पाच पैकी चार मॅच दुबईत तर एक मॅच ही अबूधाबीमध्ये होणार आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड या देशांसह पात्रता फेरीतून पुढे येणाऱ्या दोन टीमचा (A2 आणि B1) समावेश आहे.

भारताची पहिली लढत वेळापत्रक (T20 WC 2021 Schedule) या स्पर्धेची मेगाब्लास्टर असेल. भारताची पहिली मॅच ही पाकिस्तानशी 24 ऑक्टोबरला होणार आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं आजवर सर्व मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यामुळे हीच परंपरा या वर्ल्ड कपमध्येही कायम ठेवत पहिल्या विजयानं भारतीय टीम या वर्ल्ड कपच्या अभियानाची सुरुवात करेल.

पाकिस्तानला 2 बॉलमध्ये 1 रन आणि संपूर्ण ‘बॉल आऊट’ झेपलं नाही!

भारतीय टीमची दुसरी लढत 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी भारतीय टीम अफगाणिस्तान विरुद्ध खेळेल. भारतीय टीमची ही एकमेव मॅच आबूधाबीमध्ये होणार आहे. 5 नोव्हेंबरला B ग्रपमधील टॉपरशी (B1) चौथी मॅच होईल. तर भारताची साखळी फेरीतील शेवटची मॅच A ग्रुपमधून दुसऱ्या क्रमांकासह (A2) या वर्ल्ड कपसाठी पात्र होणाऱ्या टीम विरुद्ध 8 नोव्हेंबर रोजी होईल.

मॅच क्रमांकमॅचदिनांकवेळठिकाण
1भारत विरुद्ध पाकिस्तान24 ऑक्टोबर7.00 PMदुबई
2भारत विरुद्ध न्यूझीलंड31 ऑक्टोबर 7.00 PM दुबई
3भारत विरुद्ध अफगाणिस्तान3 नोव्हेंबर 7.00 PM आबूधाबी
4भारत विरुद्ध B15 नोव्हेंबर 7.00 PM दुबई
5भारत विरुद्ध A28 नोव्हेंबर 7.00 PM दुबई

टीम इंडियाचे सर्व मॅच भारतीय स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. या स्पर्धेतील साखळी फेरीतील मॅच 8 नोव्हेंबर रोजी संपतील. 10 नोव्हेंबर रोजी आबूधाबीमध्ये पहिली सेमी फायनल, 11 नोव्हेंबरला दुबईमध्ये दुसरी सेमी फायनल तर 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये फायनल मॅच होईल. दोन सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी एका अतिरिक्त दिवसाची तरतूद वेळापत्रक (T20 WC 2021 Schedule)  करण्यात आली आहे.  

टीप : मॅचची वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: