फोटो – सोशल मीडिया

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. वर्ल्ड कप फायनल. पाकिस्तानला 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 रन हवे. पाकिस्तानचा सर्वात सेट बॅटर स्ट्राईकवर. भारताचा सर्वात नवोदीत बॉलर बॉलिंग करतोय. पाकिस्तानी खेळाडूनं आधीच्या बॉलवर सिक्स मारला आहे. त्याला नंतरच्या काळात जे ‘टूक-टूक’ नाव मिळालं तसं खेळलं तरी आता चालणार आहे. कारण दबाव बॉलरवर जास्त आहे. त्याचवेळी तो स्कूप शॉट मारत सिक्स लगावण्याचा प्रयत्न करतो…आणि खेळ समाप्त. पहिला T20 वर्ल्ड कप भारताने जिंकला. मिसबाह उल हक (Misbah ul Haq) असं त्या शेवटच्या ओव्हरमध्ये ती चूक करणाऱ्या पाकिस्तानीचं नाव आहे. मिसबाहनं 14 वर्षांनंतर ती चूक का केली (Misbah admits mistake) हे सांगितले आहे.

काय घडले होते?

मिसबाह सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेच्या दरम्यान त्याने पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यावेळी नेमकी काय चूक झाली ते उघड केले आहे.

पाकिस्तानला T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 13 रन तर भारताला 1 विकेट हवी होती. त्यावेळी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला (Jogindar Sharma) देण्याचा धाडसी निर्णय घेतला. जोगिंदरनं पहिला बॉल वाईड टाकला. त्यानंतरच्या बॉलवर एकही रन निघाला नाही. त्यानंतरच्या बॉलवर मिसबाहनं सिक्स लगावला. पाकिस्तानला जिंकण्यासाठी आता 4 बॉलमध्ये फक्त 6 रन हवे होते.

पाकिस्तानसाठी मॅच सोपी झाली होती. त्यावेळी मिसबाहनं स्कूप शॉट खेळला. त्याला उंची मिळाली. पण तो बॉल लांब गेला नाही. शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करत असलेल्या श्रीसंतच्या (Sreesanth) हातामध्ये तो बॉल विसावला.

पाकिस्तान क्रिकेटमधील मिस्टर अनफिट!

काय चूक झाली?

मिसाबहने शोएबला सांगितले की, ‘2007 साली संपूर्ण स्पर्धेत त्या शॉटवर मी खूप रन काढले होते. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचमध्ये तर फाईन लेगला फिल्डर असूनही मी रन काढले होते. स्पिनर्सविरूद्ध मी फाईन लेग फिल्डरला चकवून रन काढले होते. फायनलमध्ये माझा तो शॉट चुकला. मला तेव्हा आतिआत्मविश्वास होता, असे मिसबाहने अखेर मान्य (Misbah admits mistake) केले.

2011 साली काय झाले?

2011 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. मिसाबाह त्या पराभवाचा देखील जवळचा साक्षीदार आहे. मोहालीमध्ये झालेल्या त्या मॅचमध्ये जुन्या बॉलवर रन काढणे अवघड होते. तरीही आम्ही विकेट सांभाळून खेळलतो असतो तर विजय शक्य होता. त्या वर्ल्ड कपमध्ये आम्ही शेवटच्य़ा ओव्हर्समध्ये भरपूर रन केले होते. विकेट शिल्लक असत्या तर शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये 100 रन करणे देखील शक्य होते.

पाकिस्तानला 2 बॉलमध्ये 1 रन आणि संपूर्ण ‘बॉल आऊट’ झेपलं नाही!

पाच ओव्हर्सच्या शेवटच्या पॉवर प्लेमध्ये मला फक्त 2 ओव्हर्स खेळायला मिळाल्या. मी त्यामधील 3 ओव्हर खेळलो नाही. शेवटी माझ्यासोबत एकही बॅटर शिल्लक नव्हता.’ असे कारण मिसबाहनं (Misbah admits mistake) दिले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: