फोटो – ट्विटर, ICC

यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडिया जाहीर झाली आहे. हा वर्ल्ड कप खरंतर भारतामध्ये होणार होता. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन पश्चिम आशियात होणार आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं 15 जणांच्या टीमची घोषणा (Team India squad) केली आहे. या टीममध्ये 3 जण राखीव आहेत.

कुणाची झाली निवड?

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप खेळणार आहे. यापूर्वी 2016 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2016) महेंद्रसिंह धोनी टीमचा कॅप्टन होता. आता धोनीप्रमाणेच विराटनंही पहिल्याच प्रयत्नात T20 वर्ल्ड कप जिंकावा अशी भारतीय फॅन्सची इच्छा असेल. त्याच्या मदतीला निवड समितीनं अनुभवी आणि T20 स्पेशालिस्ट खेळाडूंची फौज दिली आहे.

विराटसह रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यावर बॅटींगची जबाबदारी असेल. त्यांच्यासोबत सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या टी20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हे या टीममधील ऑल राऊंडर असतील. फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या अनुभवी खांद्यावर (Team India squad) असेल.

यूएईमधील पिच स्पिन बॉलिंगला मदत करणार हे लक्षात घेऊन अनुभवी आर. अश्विनचा (Ravichandran Ashwin) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अश्विनचे 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. अश्विन सोबत रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती हा भारतीय स्पिनर्सचा अटॅक विराटच्या मदतीला असेल. तर कोरोनाची परिस्थिती आणि दुखापतींची शक्यता लक्षात घेऊन श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर या तीन जणांचा टीममध्ये स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

ओपनिंग बॅट्समनरोहित शर्मा, विराट कोहली
मिडल ऑर्डरसूर्यकुमार यादव, केएल राहुल,
विकेट किपरऋषभ पंत, इशान किशन
ऑल राऊंडर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा
फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
स्पिन बॉलररवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर
स्टँडबायश्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

ICC विजेतेपदाची प्रतीक्षा

T20 वर्ल्ड कपसाठी ही टीम जाहीर करण्यात आली आहे. मात्र या टीममध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत कोणताही बदल करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे. त्यानंतर टीममध्ये बदल करायचा असेल तर आयसीसीच्या तांत्रिक समितीला ठोस कारण देऊन बदल करावा लागेल.

मुख्य लढाईआधीच पाकिस्तानच्या दोन्ही कोचची माघार, T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर राजीनामा

धोनीची एन्ट्री!

त्याचबरोबर या टीमसोबत (Team India squad) मेंटॉर म्हणून माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) जाणार असल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: