फोटो – ट्विटर

T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडिया जाहीर झाली आहे.  विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील टीमचा मेंटॉर म्हणून माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टीम इंडियात निवड करण्यात आली (Dhoni back in Team India dugout) आहे. धोनीच्या निवडीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रवी शास्त्रींच्या (Ravi Shastri) मार्गदर्शनाखाली सर्व कोचिंग स्टाफ असताना धोनी देखील टीमसोबत मार्गदर्शकाच्या भूमिकेत डग आऊटमध्ये असेल. धोनीची ही निवड कुणी केली? ही निवड करताना इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या कोहली-शास्त्रींचं मत विचारात घेतलं होतं का? संपूर्ण कोचिंग स्टाफ असताना धोनीचा वेगळा फायदा काय? धोनी टीम इंडियाचा हेड कोच म्हणून रवी शास्त्रींची जागा घेणार का? हे प्रश्न आता विचारले जात आहेत.

BCCI नं दिलं स्पष्टीकरण

बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी धोनीच्या निवडीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) तयारीसाठी दुबईत आहे. जय शहा यांनी धोनीसमोर दुबईमध्ये टीम इंडियाचा मेंटॉर होण्याचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव धोनीनं मान्य केला.

बीसीसीआयनं याबाबत सध्या इंग्लंडमध्ये असलेले टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री  आणि विराट कोहली यांनाही या निर्णयाची कल्पना देण्यात आली होती. त्या दोघांनी देखील या प्रस्तावाला मान्यता दिली. बीसीसीआय, धोनी, शास्त्री आणि कोहली या चौघांचेही या विषयावर एकमत झाल्यानंतर दोन वर्षांनी टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये धोनीची एन्ट्री (Dhoni back in Team India dugout) झाली आहे.

धोनीचा फायदा काय होणार?

महेंद्रसिंह धोनीची एक बुद्धीमान क्रिकेटपटू म्हणून ओळख आहे. यापूर्वीच्या सर्व T20 वर्ल्ड कपमध्ये धोनीनं टीम इंडियाची कॅप्टनसी केली आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखालीच नव्या दमाच्या भारतीय टीमनं सर्वांना आश्चर्यचकीत करत 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या T20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2007) विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तान विरुद्धचे बॉल आऊट ते फायनलमधील शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला देण्यापर्यंत अनेक ठिकाणी कॅप्टनसीचा, कल्पक निर्णय घेण्याचा धोनी टच त्या वर्ल्ड कपमध्ये जगानं पाहिला आहे.

‘धोनीच्या टेम्परामेन्टचा ICC फायनलमध्ये फायदा झाला’

फक्त T20 वर्ल्ड कप नाही तर वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी या आयसीसीच्या लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील तीन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा क्रिकेट विश्वातील एकमेव कॅप्टन आहे. या स्पर्धा जिंकतानाही धोनीचे चाणाक्ष नेतृत्त्व टीम इंडाच्या फायद्याचं ठरलं आहे. आता टीमचा मेंटॉर म्हणून या वर्ल्ड कपमध्ये कोहली-शास्त्री जोडीच्या मदतीनं विजेतेपदाचा कोड क्रॅक करण्याची जबाबदारी धोनीवर (Dhoni back in Team India dugout) असेल.

टीम इंडियाची पूर्ण ओळख

टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला धोनीबद्दल आदर आहे. विराट कोहली देखील धोनीच्या कॅप्टनसीमध्ये बराच काळ क्रिकेट खेळला आहे. तो कॅप्टन झाल्यानंतरही अनेकदा मैदानात धोनीचा सल्ला घेत असे. धोनीलाही कॅप्टनसह टीम इंडियातील सर्व खेळाडूंच्या क्षमतेची पूर्ण ओळख आहे. त्यामुळे ओळखीची टीम आणि माहितीमधील मेंटॉर अशी दोन्ही बाजूचा फायदा करणारी धोनीची निवड आहे.

T20 वर्ल्ड कपपूर्वी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी धोनी यूएईमध्ये असेल. या कालावधीमध्ये तो यूएईमधील पिचचं स्वरूप तो आयपीएलमध्ये खेळताना अगदी जवळून पाहणार आहे. आयपीएलच्या काळातील धोनीच्या इनपूट्सचा टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेत फायदा होणार आहे. यूएईमधील पिच वर्ल्ड कप काळात स्पिनर्सला साथ देतील हा विचार करत 5 स्पिनर्सचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. स्पिनर्सचा वापर करणारा सर्वोत्तम कॅप्टन म्हणून धोनी प्रसिद्ध होता. धोनीच्या या अनुभवाचा देखील (Dhoni back in Team India dugout) विराट कोहलीला फायदा होईल.

यशस्वी भव! T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर, 15 जणांच्या ‘विराट’ सेनेवर इतिहास घडवण्याची जबाबदारी

धोनी पुढील कोच होणार का?

महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून निवड होताच तो टीम इंडियाचा पुढील कोच होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. टीम इंडियाचे विद्यमान हेड कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ T20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. शास्त्री यांना मुदतवाढ मिळणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. टीमला पुढं नेणारा आणि भावी आव्हानांसाठी तयार करणारा कोच हवा आहे, असं बीसीसीआनं देखील स्पष्ट केलंय. त्यामुळे वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत धोनीची झालेली निवड तो पुढील कोच होणार या चर्चेला सुरूवात करणारी आहे.

रवी शास्त्रींचा टीम इंडियाच्या डग आऊटमधील प्रवास हा मेंटॉर, डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि हेड कोच असाच झाला आहे. धोनीच्या नियुक्तीनंतर त्याचाही हा प्रवास सुरू झाल्याचं मानलं जात आहे. तसंच टीम इंडियाच्या हेड कोचची जबाबदारी पेलण्यासाठी, संपूर्ण टीमला भावी काळातील प्रत्येक आव्हानांना तयार करण्यासाठी, नव्या खेळाडूंच्या जडणघडणीसाठी धोनी हा  उत्तम पर्याय आहे.

धोनी कोच व्हावा याचं समर्थन करणारे अनेक मुद्दे असले तरी तो स्वत: ही जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. धोनीनं रिटायर झाल्यानंतर त्याचा बहुतेक काळ हा रांचीमध्ये कुटुंबीयांसोबत घालवला आहे. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा त्याचा स्वभाव आहे. त्यात तो आता सतत प्रसिद्धीच्या झोतात असणारी आणि घरापासून कायम दूर ठेवणारी जबाबदारी स्वीकारणार का? हा खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर धोनीच्या अन्य व्यावसायिक कमिटमेंट देखील तो हेड कोच होणार की नाही? (Dhoni back in Team India dugout) याबाबत निर्णायक ठरू शकतात.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: