यूएई आणि ओमान या दोन देशांमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील गटांची घोषणा करण्यात (T20WC 2021 Groups) आली आहेभारत आणि पाकिस्तान या दोन टीमचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होणार होती. पण कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आधी एक वर्ष पुढे ढकल्यात आली. त्यानंतर भारतामधून यूएई आणि ओमान या दोन देशांमध्ये ही स्पर्धा हलवण्यात आली आहे.

पात्रता फेरीतून येणार 4 टीम

यंदा मुख्य स्पर्धेत 12 टीम खेळणार असून त्याची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटात प्रत्येकी 6 टीम आहेत. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

मुख्य स्पर्धेपूर्वी दोन गटामध्ये पात्रता फेरी (T20WC 2021 Groups) होणार आहे. यामध्ये ग्रुप A मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड आणि नामिबिया तर ग्रप 2 मध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पीएनजी, आणि यजमान ओमान यांचा समावेश आहे. या दोन्ही गटातील टॉप 2 टीम सुपर 12  म्हणजेच मुख्य स्पर्धेसाठी पात्र होतील.

कोणत्या गटात कुणाचा समावेश?

मुख्य स्पर्धेतील 12 टीमची दोन गटामध्ये (T20WC 2021 Groups)  विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटात प्रत्येकी 6 टीम आहेत. यामध्ये ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतली ग्रुप A चा विजेता आणि ग्रुप B चा उपविजेता या 6 टीम असतील.

ग्रुप B मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान या चार टीमसह ग्रुप A ची उपविजेती आणि ग्रप B च्या विजेत्या टीमचा समावेश असेल.

कशी झाली ग्रुपची विभागणी?

20 मार्च 2021 रोजी असलेल्या टीमच्या रँकिंगनुसार या ग्रुपची विभागणी (T20WC 2021 Groups) करण्यात आली आहे. त्या दिवशी असलेल्या टॉप 8 टीम मुख्य स्पर्धेला थेट पात्र झाल्या आहेत. या रँकिंगनुसार इंग्लंड पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांवरील टीम आहे. त्यामुळे त्यांचा दोन भिन्न गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

ग्रुप 1  मध्ये विद्यमान विजेता वेस्ट इंडिज आणि माजी विजेत्या इंग्लंडचा समावेश आहे. तर ग्रुप 2 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन माजी T20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा समावेश आहे. 2014 साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंकेवर यंदा पात्रता फेरीत खेळण्याची नामुष्की आली आहे.

सुपर 12 चा मेगा मुकाबला

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील लढत हा सुपर 12 चा मेगा मुकाबला असेल. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 नंतर पहिल्यांदाच या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळतील. भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवर T20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या असून त्या सर्व मॅचमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

‘महेंद्रसिंह धोनीच्या टेम्परामेन्टचा ICC फायनलमध्ये फायदा झाला’

ICC क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर वर्चस्वाचा इतिहास आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत (T20WC 2021 Groups) अशी घोषणा होताच भारताचा एक विजय पक्का झाला अशी क्रिकेट फॅन्सची भावना आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading