फोटो – ट्विटर/@BCCIdomestic

तामिळनाडूनं (Tamil Nadu) सलग दुसऱ्या सिझनमध्ये राजस्थानचा (Rajasthan) 7 विकेट्सनं पराभव करत सय्यद मुश्ताक अली T20 (Syed Mushtaq Ali Trophy 2021) स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मागच्या वर्षीची उपविजेत्या असलेल्या तामिळनाडूचा हा या स्पर्धेतील सलग सातवा विजय आहे.

तामिळनाडूनं या स्पर्धेतील यापूर्वीच्या सहाही लढती पहिल्यांदा फिल्डिंग करुन जिंकल्या होत्या. स्पर्धेच्या सेमी फायनलमध्येही राजस्थानचा कॅप्टन अशोक मनेरियानं (Ashok Menaria) टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. राजस्थानच्या खात्यात पहिला रन जमा होण्याच्या आगोदरच भरत शर्मा आऊट झाला. त्याला साई किशोरनं (Sai Kishor) आऊट केलं. आदित्य घरवालानं आशा जागवल्या पण तो देखील 29 रन काढून आऊट झाला.

दोन धक्क्यानंतरही राजस्थाननं कमबॅक केलं. कॅप्टन अशोक मनेरियानं अर्जित गुप्ताच्या मदतीनं वेगानं रन बनवले. तामिळनाडूच्या फिल्डर्सनी दोन कॅच सोडत त्यांना मदत केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 रन्सची पार्टरनरशिप केली. मनेरियानं हाफ सेंच्युरी झळकावली. मात्र त्यानंतर लगेच 51 रनवर त्याला साई किशोरनं आऊट केलं.

साई किशोरची कमाल!

मागील आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) बेंचवर बसलेल्या साई किशोरनं मुश्ताक अली स्पर्धेत सातत्यानं चांगली बॉलिंग केली आहे. त्यानं सेफी फायनल खेळण्याचं प्रेशर असतानाही 4 ओव्हर्समध्ये 16 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. साई किशोरच्या बॉलिंगमुळे 13 व्या ओव्हरमध्ये 2 आऊट 120 असा भक्कम स्कोअर असलेल्या राजस्थानच्या इनिंगला ब्रेक लागला.

( वाचा : IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या वाटचालीचा सविस्तर रिपोर्ट )

साई किशोरनं एका बाजूनं रन अडवले, दुसऱ्या बाजूनं राजस्थानच्या विकेट्स पडत गेल्या. पाचव्या नंबर पासून पुढं खेळणाऱ्या राजस्थानच्या एकाही बॅट्समनला बॉल पेक्षा जास्त रन करता आले नाहीत. त्यामुळे त्यांना तामिळनाडूपुढं 155 रन्सचं लक्ष्य ठेवता आलं.

दीपक चहर आणि राहुल चहर या चहर बंधूंच्या अनुपस्थितीमध्ये राजस्थानची बॉलिंग दुबळी झाली होती. पण त्यांनी सुरुवातीला चांगलाच प्रतिकार केला. तामिळनाडूच्या पहिल्या दोन विकेट्स झटपट गेल्या. या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या एन. जगदीशनला (N. Jagadeesan) देखील वेगानं रन करता येत नव्हते.

( वाचा : वाढदिवस स्पेशल : विजय शंकर, ‘ऑलराऊंडर इन वेटिंग )

कार्तिक शो!

जगदीशन नेहमीच्या लयीत नसूनही दुसऱ्या बाजूला असलेल्या अरुण कार्तिकनं (Arun Karthik ) दडपण घेतलं नाही. त्यानं सुरुवातीला फिल्डिंक करताना चार कॅच पकडल्या होत्या. तोच फॉर्म त्यानं बॅटिंगमध्ये कायम ठेवला. जगदिशन आऊट झाल्यानंतर तामिळनाडूचा अनुभवी कॅप्टन दिनेश कार्तिकसोबत (Dinesh Karthik) त्याची जोडी जमली.

तामिळनाडूचे पहिल्या दहा ओव्हर्सनंतर 3 आऊट 70 रन्स होते. तरीही त्यांची मॅचवरची पकड निसटली नाही. दोन्ही कार्तिकनं अगदी हिशेबी पद्धतीनं बॅटिंग करत 8 बॉल बाकी असतानाच टार्गेट चेस केलं.  

अरुण कार्तिकनं 54 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 89 रन काढले. तर दिनेश कार्तिकनं 17 बॉलमध्ये नाबाद 26 रनची खेळी केली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: