फोटो – ट्विटर/BCCI

इंग्लंडमध्ये होणारी पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि त्यानंतर होणारी भारत-इंग्लंड टेस्ट सीरिज यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टीममध्ये 20 खेळाडूंची निवड करण्यात आली असून 4 जण राखीव म्हणून इंग्लंड दौऱ्यावर जातील. 24 सदस्यांच्या या टीममध्ये 2 दिग्गजांना जागा मिळालेली नाही.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18 जून ते 22 जून या दरम्यान साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. ही फायनल झाल्यानंतर भारतीय टीम इंग्लंडमध्ये राहणार असून त्यानंतर होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी सराव करेल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 टेस्ट मॅचची सीरिज 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.

दोन दिग्गजांना संधी नाही

भारतीय टीममध्ये कोणत्याही नव्या चेहऱ्याला संधी मिळालेली नाही. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshvar Kumar) यांनाही टीममध्ये जागा मिळवण्यात अपयश आलंय. या दोन्ही खेळाडूंची निवड न होण्यात त्यांचा खराब फिटनेस हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. त्याचबरोबर ऑफ स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि फास्ट बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini) यांना वगळण्यात आलंय.

सध्या फॉर्मात असलेले पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनाही टीममध्ये संधी मिळाले नाही. शुभमन गिलला (Shubhman Gill) खराब कामगिरीनंतरही आणखी एक संधी देण्यात आली आहे.

महेंद्रसिंह धोनीला कधीही जमलं नाही, ते ऋषभ पंतनं करुन दाखवलं!

अनुभवी खेळाडूचं पुनरागमन

टीम इंडियाच्या 20 सदस्यांमधील सर्व खेळाडू हे ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड यांच्यातील सीरिज खेळलेले सदस्य आहेत. रवींद्र जडेजा, हनुमा विहारी आणि मोहम्मद शमी या तिघांचं दुखापतीनंतर टीममध्ये पुनरागमन झालंय. तर शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची इंग्लंड सीरिजमधील चांगल्या कामगिरीमुळे निवड झाली आहे.

के.एल. राहुल आणि वृद्धीमान साहा यांना इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी फिटनेस सिद्ध करावा लागेल. राहुलची आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान सर्जरी झाली होती. तर साहाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

World Test Championship Final आणि इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडिया

ओपनिंग बॅट्समनरोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल
मिडल ऑर्डरविराट कोहली (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), हनुमा विहारी
ऑल राऊंडररवींद्र जडेजा
विकेट किपरऋषभ पंत
स्पिन बॉलरआर. अश्विन, अक्षर, पटेल, वॉशिंग्टन सुंदर
फास्ट बॉलरइशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
फिटनेस सिद्ध करणे आवश्यकके.एल. राहुल, वृद्धीमान साहा
राखीव खेळाडूअभिमन्यू इश्वरन, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, अरझान नागवासवाला

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: