फोटो – श्रेयस अय्यर/इन्स्टाग्राम

कोणत्याही क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीमध्ये दुखापतीनंतर पुन्हा एकदा स्वत:ला खेळण्यासाठी फिट करणे हे आव्हानात्मक काम असते. टीम इंडियामध्ये तर प्रत्येक जागेसाठी दोन-तीन पर्याय असल्यानं हे काम आणखी अवघड आहे. टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील दुखापतीमधून बरा होऊन पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी स्वत:ला सज्ज करत आहे. श्रेयसनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन त्याच्या तयारीची माहिती सर्वांना दिली (Shreyas Iyer Injury Update) आहे.

कधी झाली होती दुखापत?

श्रेयस अय्यरला मार्च महिन्यात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे सीरिजच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या खांद्याला पहिल्या वन-डेच्या दरम्यान (India vs England One Day Series 2021) फिल्डिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित वन-डे सीरिज तसेच आयपीएल स्पर्धेचा (IPL 2021) पहिला हाफ खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर ऋषभ पंतला (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या सिझनसाठी कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे. या दुखापतीनंतर श्रेयसचे ऑपरेशन झाले. त्यानंतर तो आता बरा होण्यासाठी मेहनत करत आहे.

व्हिडीओमध्ये काय?

श्रेयसनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक चढ पळत पूर्ण करत आहे.त्यानंतर तो तिथून खाली देखील येताना दिसतो. श्रेयस अय्यरच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये एक प्रतिक्रिया त्याचा मुंबई आणि टीम इंडियातील सहकारी सूर्यकुमार यादवची  (Suryakuma Yadav) देखील आहे. त्याने, ‘ही तर शहेनशाहा सारखी दौड आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

श्रेयसनं काही दिवसांपूर्वी एक व्यायाम करण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो खांदादुखीमधून बरं होण्यासाठी सर्व प्रकारचा व्यायाम (Shreyas Iyer Injury Update) करताना दिसत आहे.

श्रीलंका दौरा लक्ष्य

टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्या काळात सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असतील. त्यामुळे सर्व तरुण मंडळींना टीममध्ये संधी मिळणार आहे. या दौऱ्यासाठी फिट होण्याचे श्रेयसचे लक्ष्य आहे. श्रेयसचा फिटनेस निवड समितीला समाधानकारक वाटला तर त्याची टीममध्ये निवड होईल. त्याचबरोबर तो टीमचा कॅप्टनही होऊ शकतो. श्रेयसकडे दिल्ली कॅपिटल्स टीमच्या कॅप्टनसीचा अनुभव असून त्याच्या कॅप्टनसीने अनेकांना प्रभावित केले होते. श्रेयसचा व्हाईट बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला आहे. त्याने 22 वन-डे मध्ये 42.78 च्या सरासरीने 813 रन काढले आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 8 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याने 29 T20  मॅचमध्ये 133.81 च्या स्ट्राईक रेटनं 3 हाफ सेंच्युरींसह 550 रन काढले आहेत.

विराट, रोहित, बुमराह नसले तरी काळजी नाही, ‘हे’ 16 जण करणार श्रीलंकेचा दौरा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: