फोटो – ट्विटर, जयदेव उनाडकट

टीम इंडियाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करावे आणि चांगली कामगिरी करुन आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावे अशी प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. काहींचे क्रिकेट करिअर संपते पण त्यांना डेब्यू करण्याचीही संधी मिळत नाही. परंतु संधी मिळूनही आपली छाप न उमटवू शकल्याने काही क्रिकेटपटूंच्या नावाचीही चर्चा बंद झाली. यातीलच एक नाव म्हणजे जयदेव उनाडकट. लेफ्टआर्फ फास्ट बॉलर जयदेवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला टीम इंडियाकडून संधी मिळाली. मात्र विकेटची पाटी कोरी राहिल्याने त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. सौराष्ट्राला रणजी ट्रॉफी जिंकून देणारा जयदेव उनाडकट गेल्या 12 वर्षापासून टेस्ट क्रिकेटमध्ये कमबॅक (Jaydev Unadkat Emotional Tweet) करण्याची प्रतिक्षा करत आहे.

भावूक ट्विट

जयदेव उनाडकट याने एक भावूक ट्विटही केले आहे. बीसीसीआये रणजी ट्रॉफी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर उनाडकट याने मंगळवारी मध्यरात्री ट्विट केले. सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा स्थगित झाल्यामुळे उनाडकट भावूक झाला. ‘प्रिय रेड बॉल, कृपया मला एक संधी दे. अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवण्याचे वचन देतो’, असे ट्विट उनाडकट (Jaydev Unadkat Emotional Tweet) याने केले आहे.

शार्दुल कसा बनला ‘लॉर्ड ठाकूर’, अखेर रहस्य उलगडले…

जयदेव उनाडकट याने वयाच्या 19 व्या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पण केले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये 2010 साली तो आपली पहिली टेस्ट मॅच खेळला होता. या मॅचमध्ये त्याने 26 ओव्हरची बॉलिंग केली आणि 101 रन दिले. मात्र त्याला एकही विकेट्स घेता आली नाही. ती टेस्ट टीम इंडियाने एक इनिंग आणि 26 रनने गमावली. ही मॅचच त्याची एकमेव टेस्ट ठरली. यानंतर उनाडकटला पुन्हा कधीही टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी (Jaydev Unadkat Emotional Tweet) मिळाली नाही.

टेस्ट क्रिकेटनंतर त्याने 2013 ला वन डे आणि 2016 ला T20 क्रिकेटमध्ये डेब्यू केले. मात्र इथेही त्याची कारकिर्द जास्त लांबली नाही. 2013 नंतर वन डे आणि 2018 नंतर T20 टीममधूनही त्याचा पत्ता कायमचा कट झाला. त्याने टीम इंडियाकडून 7 वन डे आणि 10 T20 मॅच खेळल्या. यात त्याने अनुक्रमे 8 आणि 14 विकेट्स घेतल्या.

ऐतिहासिक बोली

जयदेव उनाडकट याला आयपीएलमुळे एक वेगळी ओळख मिळाली. 2018 च्या आयपीएल (IPL 2018) लिलावामध्ये त्याला सर्वात मोठी बोली लागली होती. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्याला 11.5 कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. 2017 च्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2018) पुणे सुपरजायंट्स कडून खेळताना केलेल्या त्याने अखेरची ओव्हर मेडन टाकत हॅटट्रीक घेतली होती आणि याच कामगिरीचे बक्षिस त्याला त्यावेळी मिळाले होते.

रणजी ट्रॉफी स्थगित

कोव्हिडचे संकट वाढत असल्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) रणजी ट्ऱॉफी (Ranji Trophy) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटपटूंचे आरोग्य आणि सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. रणजी ट्रॉफीसह सीके नायडू ट्रॉफी (Col C K Nayudu Trophy) आणि महिला T20 लीगही स्थगित (Senior Women’s T20 League) करण्यात आली आहे. मात्र सध्या सुरू असलेली कूचबिहार ट्रॉफी सुरुच ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

रणजी ट्रॉफी 13 जानेवारीपासून सुरू होणार होती. मात्र त्यापूर्वीच मुंबई, बंगाल आणि अन्य काही राज्यांच्या टीममधील प्लेअर्स आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून बीसीसीआयने ट्रॉफी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सलग दुसऱ्या वर्षी ही ट्रॉफी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उनाटकट (Jaydev Unadkat Emotional Tweet) याचाही हिरमोड झाला आहे.

निरोपाची वेळ झाली! वर्ल्ड क्रिकेटमधील ‘हे’ दिग्गज 2022 मध्ये घेणार निवृत्ती

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: