फोटो – सोशल मीडिया

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) 2021 हे वर्ष खराब गेले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, T20 वर्ल्ड कप 2021 मधील मानहानीकारक पराभवाचा परिणाम त्याच्या कॅप्टनसीवर झाला. त्यानं T20 टीमची कॅप्टनसी सोडली. वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरून त्याची हकालपट्टी झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराटनं टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचाही राजीनामा दिला. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्येही विराट आरसीबीचा कॅप्टन नाही. त्यातच त्याला दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेंच्युरी करता आलेली नाही. विराटच्या करिअरमधील बॅड पॅचचा मोठा परिणाम त्याच्या ब्रँडवरही झाला आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli brand value) मागच्या वर्षभरात झपाट्यानं कमी झालीय.

एका वर्षात 400 कोटींचं नुकसान

विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूत मागच्या वर्षात 22 टक्क्यांची घट झाली. कन्सल्टन्सी फर्म डफ अँड फेल्प्सच्या (Duff & Phelps) रिपोर्टनुसार 2020 वर्षामध्ये विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 23 कोटी 77 लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार 1806. 61 कोटी रुपये इतकी होती. तर 2021 मध्ये ब्रँड व्हॅल्यू 18 कोटी 57 डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार 1411. 39 कोटींपर्यंत घसरली (Virat Kohli brand value) आहे.

...तरी विराट नंबर 1

ब्रँड व्हॅल्यूत 400 कोटींचे नुकसान होऊनही जाहिराती, प्रमोशनच्या माध्यमातून होणाऱ्या उत्पन्नाच्या बाबतीत विराट कोहली 18.57 कोटी डॉलरसह विराट नंबर 1 आहे. गेली 5 वर्ष त्याने पहिला क्रमांक कायम राखला आहे. असं असलं तरी हे चित्र आगामी काळात बदलू शकतं. खराब कामगिरी, ढासळलेला फॉर्म आणि घसरलेली आयसीसी रँकिंग याचा परिणाम विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूवर दिसू लागला आहे. अनेक कंपन्या आपल्या जाहिरातीत कोहली ऐवजी केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंना प्राधान्य देत आहेत. ब्रँड व्हॅल्यूच्या यादीत विराट कोहली नंतर अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) नंबर लागतो.

शुभमन गिल म्हणतो, ‘विराट ‘या’ बाबतीत माझ्यापेक्षा मागे, मी त्याला शिकवेन’

धोनीची भरारी

टॉप 20 सेलिब्रिटी ब्रँड्सच्या यादीत अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. त्याचबरोबर खेळाडूही मागे नाहीत. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, पी व्ही सिंधू सारख्या यशस्वी खेळाडूंची देखील या यादीत जागा कायम आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) 462 कोटी ब्रँड व्हॅल्यूसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. धोनीनं 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतरही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ झाली आहे.

या आयपीएलमध्ये कोहली प्रमाणेच धोनीही कॅप्टन नाही. गेल्या दोन वर्षात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे चित्रपट रिलीज न झाले नाहीत. त्याचा खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूला फायदा झाल्याचं उघड झालं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: