फोटो – सोशल मीडिया

रवी शास्त्री (Ravi Shastri) हे टीम इंडियाचे सर्वात यशस्वी कोच आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय टीमनं सलग दोनदा ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकली. हा पराक्रम करणारे ते आशियाई टीमचे एकमेव कोच आहेत. कोणत्याही कोचिंगच्या प्रशिक्षणाशिवाय शास्त्रींनी हा इतिहास रचला आहे. एका ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी शास्त्रींनी त्यांच्या कोचिंगचा मंत्र (Ravi Shastri Coaching Mantra) सांगितला. त्याचबरोबर देशातील एका लॉबीवरही त्यांनी टीका केली.

काय म्हणाले शास्त्री?

रवी शास्त्री 2014 ते 2021 य़ा कालखंडामधील एक वर्षाचा अपवाद सोडला तर संपूर्ण काळ टीम इंडियासोबत होते. आधी डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि हेड कोच म्हणून त्यांनी काम केलं. ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये माझ्यावर जळणारे, मी फेल व्हावं अशी इच्छा असणारे लोकं भारतामध्ये होते, असा दावा केला आहे.

या मुलाखतीमध्ये शास्त्री यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) नवे संचालक रॉबर्ट की यांना जाड कातडीचं होण्याचा सल्ला दिला आहे. शास्क्री यावेळी म्हणाले की, ‘माझ्याकडं कोचिंगची कोणतीही डिग्री नव्हती लेव्हल एक, लेव्हल दोन असं काहीही नव्हतं. भारतामध्ये माझ्यावर जळणारा एक ग्रुप होता. मी फेल व्हावं अशी त्यांची इच्छा होती. माझं कातडं जाड ( मी इतरांच्या बोलण्याकडं लक्ष देत नाही) आहे.

Ravi Shastri Coach Review: लाख चुका असतील केल्या, केली पण…

तुम्ही (इंग्लंडमध्ये) ज्या ड्यूक बॉलकचा वापर करता त्यापेक्षाही जाड आहे. मी त्याकडं लक्ष दिलं नाही. आता रॉबर्ट काम सुरू करतील तेव्हा त्याला देखील या पद्धतीनं वागणं शिकावं (Ravi Shastri Coaching Mantra) लागेल. कारण रोज तुम्ही केलेल्या कामावर प्रतिक्रिया येत असतात. केंट टीमचा कॅप्टन म्हणून त्यानं केलेल्या कामचा यामध्ये त्याला फायदा होईल,’ असे शास्त्रींनी यावेळी स्पष्ट केले.

एक शिवी दिली तर…

रवी शास्त्रींनी यावेळी टीम संस्कृतीवर भर दिला. ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन सीरिज जिंकण्यामध्ये याचा खूप उपयोग झाला, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘आपम आक्रमक होऊन विरोधी टीमला कोणतीही संधी न देता खेळलं पाहिजे. फिटनेसचा सर्वोच्च स्तर, 20 विकेट्स घेऊ शकतील अशा बॉलर्सचा ग्रप तयार करणे यामध्ये आवश्यक आहे. कुणी एकदा अपशब्द (शिवी) वापरले तर तुम्ही तीन अपशब्द वापरून त्याला उत्तर द्या असं मी मुलांना सांगितलं होतं. यापैकी एक त्यांच्या भाषेत तर दोन तुमच्या भाषेतील अपशब्द वापरा,’ असं शास्त्रींनी यावेळी सांगितलं.

इंग्लंडचा नवा कॅप्टन म्हणून बेन स्टोक्स चांगला आहे. तो सर्वोत्तम खेळाडू आहे. खेळाडूंचं कॅप्टनशी असलेलं नातं महत्त्वाचं असतं. हे नातं बिघडलं तर परिस्थिती बिघडू लागते.’ असं शास्त्री (Ravi Shastri Coaching Mantra) म्हणाले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: