कष्ट, शिस्त, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या 4  खांबाच्या आधारावर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) त्याची कारकिर्द उभारली. आपण ज्यांना ‘आदर्श’ मानतो… त्यांचे पाय देखील मातीचे असल्याचा अनुभव प्रत्येकाला येतो. एखादा व्यक्ती स्खलनशील आहे, म्हणजे काय हे सांगणारी अनेक उदाहरणं आजूबाजूच्या जगात अनेक आहेत. अन्य कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच क्रिकेटचाही त्यामध्ये समावेश आहे. पण, या सर्व गर्दीतही राहुल द्रविड वेगळा आहे. तो वेगळा आहे हे गेल्या 26 वर्षात अनेकदा दिसलं. त्याच्यावर टीका करणारा टीम इंडियाचा विकेट किपर वृद्धिमान साहाला द्रविडनं दिलेलं उत्तर वाचल्यावर (Dravid on Saha criticism) आपल्याला द्रविडचा पुन्हा एकदा अभिमान वाटणार आहे.

काय म्हणाला होता साहा?

राहुल द्रविडनं साहाला काय उत्तर दिलं हे समजण्यापूर्वी ऋद्धिमान साहानं (Wriddhiman Saha) द्रविडवर काय आरोप केले होते, हे समजून घेणे आवश्यक आहे. भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) टेस्ट सीरिजसाठी साहाची निवड झाली नाही. टीममध्ये निवड न झाल्यानं नाराज झालेल्या साहानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडवर टीका केली होती.

‘टीम इंडिया नव्या विकेट किपरचा विचार करत आहे. त्यामुळे तुझी आगामी सीरिजसाठी निवड होणार नाही, असं द्रविडनं आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सांगितलं. त्याचबरोबर  तुला वेगळा निर्णय (निवृत्तीचा निर्णय) घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतोस,’ असे देखील सुचवले असा दावा साहाने केला होता.

टीम इंडियाचा विकेटकिपर वृद्धिमान साहाचा द्रविड-गांगुलीवर गंभीर आरोप, क्रिकेट विश्वात खळबळ

मला अजिबात वाईट वाटले नाही…

भारताने वेस्ट इंडिज विरूद्धची सीरिज 3-0 या फरकाने जिंकली. त्यानंतर राहुल द्रविडने साहाच्या या टीकेला उत्तर (Dravid on Saha criticism) दिलं आहे. द्रविडने त्याच्या उत्तराची सुरूवातच मला अजिबात वाईट आला नाही… या वाक्याने केली आहे.

साहाला उत्तर देताना द्रविड म्हणतो की, ‘मला अजिबात वाईट वाटले नाही. ऋद्धिमान साहा आणि त्याच्या भारतीय क्रिकेटबद्दलच्या योगदानाबद्दल मला खूप आदर आहे. मी त्याच आदरपूर्वक भावनेतून त्याच्याशी चर्चा केली. सत्य परिस्थिती समजणे हा त्याचा अधिकार आहे. त्याला या गोष्टी मीडियातून समजाव्यात असं मला वाटत नव्हते.’   

राग येणे स्वाभाविक…

खेळाडूंना त्याचे बोलणे नेहमी आवडणार नाही, याची द्रविडला जाणीव आहे. तरीही तो या प्रकराची चर्चा पुढेही करण्यावर ठाम आहे. याचं द्रविडनं कारणही (Dravid on Saha criticism) सांगितलं आहे.

‘माझं मत खेळाडूंना नेहमीच पटेल अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण, याचा अर्थ आम्ही त्या चर्चा कधीच करणार नाही, असा होत नाही. मी कोणत्याही कठीण प्रसंगात चर्चेवर विश्वास ठेवतो. त्यामुळे मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. खेळाडूंना राग येणे, त्यांना पीडित असल्याचं वाटणे, हे अगदी स्वाभाविक आहे.’

राहुल द्रविडच्या 49 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

मी आणि रोहित एक काम करतो…

राहुल द्रविडनं यावेळी कोणत्याही मॅचसाठी प्लईंग 11 निवडताना तो आणि कॅप्टन (रोहित शर्मा) एक काम नेहमी करतात. ते नेहमीचं काम कोणतं हे देखील सांगितलं आहे,

‘प्रत्येक मॅचमधील प्लेईंग 11 निवडताना मी किंवा रोहित शर्मा टीममध्ये निवड न झालेल्या खेळाडूंशी चर्चा करतो. त्यांची टीममध्ये निवड का झाली नाही? त्याचबरोबर एखाद्या खेळाडूची निवड का झाली? या त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची आमची तयारी असते.’ असं द्रविडने सांगितलं.

साहाची निवड का नाही?

द्रविडनं यावेळी साहाची श्रीलंका सीरिजसाठी निवड का झाली नाही याचे कारण देखील सांगितले आहे. ‘यावर्षी टेस्ट मॅच कमी आहेत. त्यामुळे नवा विकेटकिपर तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. ऋषभनं नंबर 1 विकेट किपर म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. आम्हाला आता एक तरूण विकेट किपर हवा आहे. तसं असलं तरी साहाबद्दलचा माझा आदर कमी होत नाही,’ असे द्रविडने स्पष्ट (Dravid on Saha criticism) केले.

भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात पुढील महिन्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून केएस भरतची निवड झाली आहे. मागील वर्षी न्यूझीलंड विरूद्धच्या सीरिजमध्ये तो वृद्धिमान साहाचा बॅकअप होता. त्याने त्या सीरिजमधील एका इनिंगमध्ये विकेट किपिंग देखील केली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: