फोटो – ट्विटर

भारतीय टीम दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यातील सिडनी टेस्टनंतर  कुलदीप यादव (Kuldeep Yadav) हा आमचा विदेशातील नंबर 1 स्पिनर आहे, असं कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी जाहीर केलं होतं. शास्त्रीनं हे जाहीर केल्यानंतर पुढील दोन वर्षात त्याला फक्त एका टेस्टमध्ये संधी मिळाली. दोन वर्ष बेंचवर बसवल्यानंतर त्याला आता टीम इंडियातून वगळण्यात आलंय. इतकंच नाही तर त्याला त्याच्या आयपीएल टीममधील (KKR) अंतिम 11 मध्येही संधी मिळाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून आपण महेंद्रसिंह धोनीला मिस करत असल्याची भावना कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav on Dhoni) बोलून दाखवली आहे.

पाच विकेट्सनंतर टीममधून बाहेर

कुलदीप यादव 2019 साली सिडनी टेस्टमध्ये खेळला. पावसाचा अडथळा आलेल्या त्या टेस्टमध्ये टीम इंडियाला एकच इनिंग पूर्ण बॉलिंग करता आली. त्या इनिंगमध्ये कुलदीपनं 5 विकेट्स घेतल्या. सिडनी टेस्ट नंतरच्या दोन वर्षांमध्ये भारतानं वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पाच देशांशी मिळून 17 टेस्ट खेळल्या. यामध्ये सलग 14 टेस्ट बाहेर बसल्यानंतर 15 व्या टेस्टमध्ये फक्त एकदा चेन्नईत कुलदीपला संधी मिळाली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपले सर्व प्रमुख बॉलर्स जखमी झाले. नेट बॉलर म्हणून गेलेल्या वॉशिंग्टन सुंदरनं पदार्पण केलं. पण, कुलदीप मुख्य टीममध्ये असूनही बेंचवरच बसला. या दोन वर्षांच्या अनुभवानंतर कुलदीपनं आपण महेंद्रसिंह धोनीला (Kuldeep Yadav on Dhoni) मिस करत असल्याचं सांगितलं.

World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, ‘या’ दिग्गजांना वगळलं

काय म्हणाला कुलदीप?

कुलदीपनं ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीबद्दल सांगितलं आहे. “मी कधी-कधी त्याचं (धोनी) मार्गदर्शन मिस करतो. त्याच्याकडं मोठा अनुभव होता. तो स्टंपच्या मागून आमची मदत करत असे. सतत सूचना देत असे. हा अनुभव आम्ही मिस करतोय. आता ऋषभ आहे, तो जितका शिकेल तितकं अधिक इनपूट देईल.

मला वाटतं प्रत्येक बॉलरला दुसऱ्या बाजूनं मदत करणाऱ्या बॉलरची गरज असते. माही भाई होता तेव्हा मी आणि चहल एकत्र खेळत होतो. माही भाई गेल्यापासून आम्ही एकत्र खेळत नाही. तो गेल्यानंतर मी जवळपास 10 मॅच खेळल्या असतील. मी हॅटट्रिक देखील घेतलीय. तुम्ही माझ्या कामगिरीचा एकत्रित विचार केला तर ती चांगली दिसेल. पण, त्याचा अधिक बारकाईनं अभ्यास केला तर आमची कामगिरी अपेक्षा पूर्ण करणारी नसल्याचं लक्षात येईल. त्याचबरोबर विरोधी टीमचाही विचार केला पाहिजे.” असं कुलदीपनं सांगितलं.

IPL 2021 स्थगित झाल्यानं ‘या’ 5 फ्लॉप स्टार्सनी सोडला सुटकेचा निश्वास

आकडे काय सांगतात?

काही महिन्यांपूर्वी भारत-इंग्लंड (India vs England) सीरिजच्या वेळी Cricbuzz या वेबसाईटनं एक आकडेवारी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये धोनी होता तेव्हा कुलदीपनं 47 मॅचमध्ये मध्ये 22.53 ची सरासरी आणि 4.87 च्या इकॉनॉमी रेटनं 91 विकेट्स घेतल्या आहेत. तर युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) या काळात 46 मॅचमध्ये मध्ये 25.32 ची सरासरी आणि 4.95 च्या इकॉनॉमी रेटनं 81 विकेट्स घेतल्या आहेत.

फोटो – Cricbuzz

धोनी शिवाय कुलदीपला 16 मॅचमध्ये 61.71 ची सरासरी आणि 6.22 च्या इकॉनीमी रेटनं 14 विकेट्स मिळाल्या आहेत. तर चहलला 8 मॅचमध्ये 41.82 ची सरासरी आणि 6.80 च्या इकॉनॉमी रेटनं 11 विकेट्स मिळाल्या आहेत.

धोनीच्या काळात आणि धोनीच्या पश्चात असलेली ही आकडेवारीच कुलदीप धोनीला किती मिस करतोय (Kuldeep Yadav on Dhoni) हे सांगण्यास पुरेशी आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: