फोटो – NDTV

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार (India Tour of South Africa) आहे. या दौऱ्यावर ओमिक्रॉनचं सावट आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) हेड कोच झाल्यानंतर टीम इंडियाचा पहिलाच विदेश दौरा आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचं टीम इंडियाचं ध्येय आहे. त्यापूर्वी क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य कारणांमुळेच टीम इंडिया चर्चेत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन कॅप्टनच्या भोवती हा वाद आहे. या दोघांमधील एक कॅप्टन विराट कोहली आज (15 डिसेंबर) मीडियासमोर येणार आहे. विराटकडून यावेळी काही गंभीर प्रश्नांवर उत्तरं मिळणार (Virat Kohli Press Conference) आहेत.

विराट का येणार मीडियासमोर?

टीम इंडिया गुरुवारी (16 डिसेंबर) रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली मुंबईत मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं देईल. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टेस्टच्या सीरिजला 26 डिसेंबर रोजी सुरूवात होईल.

दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तेथील नियमानुसार त्यांना काही दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे भारतीय टीम 16 तारखेलाच रवाना होईल. भारतीय क्रिकेट टीममधील प्रथेनुसार विदेश दौऱ्यावर जाण्याच्या आदल्या दिवशी टीमचा कॅप्टन मीडियासमोर येऊन त्या दौऱ्याशी संबंधित प्रश्नांना उत्तर देतात. त्यामुळे विराटला मीडियासमोर यावं लागेल. त्यावेळी काही गंभीर प्रश्नांची त्याला उत्तरं द्यावी लागतील.

पहिला प्रश्न

विराट कोहलीला वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून कायम राहयचं होतं, असे वृत्त होते. T20 टीमची कॅप्टनसी स्वत:हून सोडणारा विराट वन-डे टीमचं नेतृत्त्व सोडण्यास तयार नव्हता. त्याला निवड समिताला दूर करावं लागलं. या वृत्तावर विराटला मीडियाच्या माध्यमातून (Virat Kohli Press Conference) जगाला उत्तर द्यावं लागणार आहे.

विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला कॅप्टन का करण्यात आले? वाचा Inside Story

दुसरा प्रश्न

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील मतभेदाची चर्चा सध्या जोरदार आहे. रोहितला व्हाईस कॅप्टन पदावरून हटवा असा प्रस्ताव विराटनं निवड समितीला दिल्याचं वृत्त काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सातत्याने ही चर्चा सुरू आहे. T20 वर्ल्ड कपमधील पराभावनंतर तर ही चर्चा आणखी जोरात सुरू झाली आहे.

रोहित शर्माकडे कॅप्टनपद देण्यास विराट खूश नव्हता का? रोहित आणि विराट यांच्यात नेमकं नातं कसं आहे याबाबत विराट स्पष्टीकरण देणार आहे.

तिसरा प्रश्न

रोहित शर्माच्या दुखापतीचं स्वरूप कसं आहे. त्याच्या अनुपस्थितीचा टीम इंडियांच्या तयारीला कितपत फटका बसेल? रोहितच्या अनुपस्थितीमध्ये राहुल, मयांक आणि प्रियांक यापैकी कोणते दोन जण पहिल्या टेस्टमध्ये ओपनिंग करतील?  रोहित वन-डे सीरिजपूर्वी नीट होईल का? या प्रश्नाची उत्तरंही (Virat Kohli Press Conference) विराटकडून मिळणार आहेत.

चौथा प्रश्न

विराट कोहली वन-डे सीरिज खेळणार नाही, असे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले आहे.  हे वृत्त किती खरे आहे? विराट कोहलीनं वन-डे सीरिज खेळण्यामधून सुट्टी मागितली आहे का?  रोहित फिट झाला नाही आणि विराटही सुट्टीवर गेला तर दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये कोण कॅप्टन असावं असं विराटला वाटतं या सर्व प्रश्नांची विराट काय उत्तर देणार (Virat Kohli Press Conference) याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

रोहित शर्माच्या जागी टीम इंडियात निवड झालेला प्रियांक पंचाल कोण आहे?

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.