फोटो – ट्विटर

ऑलिम्पिकसह जगातील अनेक क्षेत्रामध्ये महासत्ता असलेल्या अमेरिकेनं आता क्रिकेटवरही लक्ष केंद्रीत केलं आहे. श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड या देशातील क्रिकेटपटूंनी त्यांचे क्रिकेट सोडून अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटपटूंची आयात करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाला आता आणखी एक मोठं यश मिळालं आहे. टीम इंडियाचा अंडर 19 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने वयाच्या 28 व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची घोषणा केली आहे. त्याने ही घोषणा करत अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले (Unmukt Chand quits BCCI) आहे.

काय म्हणाला उन्मुक्त?

उन्मुक्त चंदनं ट्विट करत भारतीय क्रिकेट सोडण्याची घोषणा केली आहे. ‘क्रिकेट हा एक युनिव्हर्सल खेळ आहे. कदाचित उद्देश बदलेल पण लक्ष्य एकच आहे तो म्हणजे सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणे. माझे सर्व समर्थक आणि फॅन्स यांचे मनापासून आभार. तुम्ही तुमच्या ऱ्हदयात मला जागा दिली. तुम्ही जसे आहात तसं तुमच्यावर लोकं प्रेम करतात यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की माझ्याजवळ अशी लोकं आहेत. सर्वांचे आभार. पुढच्या अध्यायाकडं वळत आहे.’

उन्मुक्तची कारकिर्द

उन्मुक्त चंद हा 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा कॅप्टन होता. त्या वर्ल्ड कपमधील फायनलमध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरी झळकावत टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. या खेळीमुळे त्याला देशात मोठी प्रसिद्धी मिळाली. रणजी क्रिकेट तसेच आयपीएलमध्येही तो खेळला. पण त्याला तिथं सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो कधीही टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट (Unmukt Chand quits BCCI) खेळला नाही.

उन्मुक्तनं वयाच्या 17 व्या वर्षी दिल्लीकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चौथ्या रणजी मॅचमध्येच त्यानं सेंच्युरी झळकावत 151 रनची खेळी केली. त्याने 67 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 31.57 च्या सरासरीनं 3379 रन काढले. A श्रेणीच्या 120 लढतीत त्याने 41.33 च्या सरासरीनं 4505 तर 77 T20 मॅचमध्ये 22.35 ची सरासरी आणि 116.09 च्या स्ट्राईक रेटनं 1565 रन केले.

उन्मुक्त चंदला वयाच्या 18 व्या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमचाही तो काही काळ सदस्य होता. पण, आयपीएल स्पर्धेत तो यशस्वी झाला नाही. न्यूझीलंड A आणि बांगलादेश A विरुद्ध 2015 साली विजय मिळवणाऱ्या इंडिया A टीमचाही तो सदस्य होता.

उन्मुक्त चंदनं 2019 साली दिल्ली सोडून उत्तराखंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. तिथंही त्याला फार यश मिळालं नाही. उत्तराखंडकडून 7 मॅचमध्ये 13.92 च्या सरासरीनं त्यानं 195 रन केले.

पक्षपाताचा आरोप करत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं सोडला देश, आता अमेरिकेकडून खेळणार

पुढे काय होणार?

उन्मुक्त चंदनं जाहीर केलं नसलं तरी तो आता अमेरिकेकडून खेळणार हे स्पष्ट आहे. तो तीन वर्षांनंतर अमेरिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळण्यास पात्र होईल. तोपर्यंत उन्मुक्त हा अमेरिकेतील क्लब क्रिकेटमध्ये खेळेल.

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा BCCI ला रामराम, ‘अमेरिकन ड्रीम’ चा करणार पाठलाग

उन्मुक्त चंदच्या अंडर 19 टीममधील विकेट किपर बॅट्समन स्मित पटेलनं यापूर्वीच बीसीसआयला निरोप देत (Unmukt Chand quits BCCI) अमेरिकेकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात भारतीय उपखंडातील आणखी काही क्रिकेटपटू याच मार्गावर वाटचाल करत अमेरिकेची वाट धरण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: