
कोरोना व्हायरसमुळे 2020 मधील बहुतेक काळ क्रिकेट वाया गेल्यानंतर टीम इंडिया (Team India) नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. या वर्षातील एकही महिन्यात भारतीय खेळाडू क्रिकेटपासून दूर नसतील. या वर्षभरात कोणत्या पाच प्रमुख आव्हानांचा टीम इंडियाला सामना करावा लागणार आहे पाहूया
पहिलं आव्हान : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border- Gavaskar Trophy)
नव्या वर्षाची सुरवातच या आव्हानानं होणार आहे. भारतानं मेलबर्नमध्ये झालेली बॉक्सिंग डे (Boxing Day) टेस्ट जिंकली. या विजयामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) सीरिज सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) च्या टीमला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखण्यासाठी उर्वरित दोन टेस्ट पैकी किमान एक टेस्ट जिंकणं आवश्यक आहे.
दुसरं आव्हान : भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज (IND vs ENG)
IPL 2020 आणि भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (India Tour of Australia) या दोन प्रमुख स्पर्धांसाठी सुमारे पाच महिने भारतीय खेळाडू देशाबाहेर होते. या मोठ्या दौऱ्यानंतर परल्यानंतर लगेच त्यांना इंग्लडच्या आव्हानाचा भारतामध्ये सामना करायचा आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (ICC World Test Championship) फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध होणारी चार टेस्ट मॅचची सीरिज चांगल्या फरकानं जिंकणे आवश्यक आहे.
तिसरं आव्हान : आशिया कप (Asia Cup)
श्रीलंकेत जुलै महिन्यात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारताला परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. दोन्ही टीम आयसीसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 नंतर (ICC Cricket World Cup 2019) पहिल्यांदाच एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकतील. या हायव्होल्टेज लढतीकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून देखील या स्पर्धेकडं पाहिलं जात आहे.
चौथं आव्हान : भारताचा इंग्लंड दौरा (India Tour of England)
टीम इंडिया ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पाच टेस्टच्या सीरिजसाठी इंग्लंडमध्ये असेल. मागील इंग्लंड दौऱ्यात भारताचा 1-4 असा पराभव झाला होता. टीम इंडियासाठी 2021 मधील सर्वात खडतर टेस्ट सीरिज इंग्लंडमध्ये असणार आहे.
( वाचा : वाचा सविस्तर : टीम इंडियाचे 2021 मधील संपूर्ण वेळापत्रक )
पाचवं आव्हान : T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021)
भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा भारत हा प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर यजमान म्हणून टीम इंडियावर वेगळं दडपण असेल. चार वर्षांपूर्वी घरच्या मैदानात झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता. आता चार वर्षांनी घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी भारतीय टीमला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.