
कोरोना व्हायरसमुळे 2020 या वर्षी फारसं क्रिकेट होऊ शकलं नाही. आता नव्या वर्षात नव्या जोशात टीम इंडिया (Team India) क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. हे संपूर्ण वर्ष टीम इंडियाचं भरगच्च वेळापत्रक असून भारतीय क्रिकेट फॅन्सना नवनवीन मेजवानी मिळणार आहे.
टीम इंडियाचे 2021 मधील वेळापत्रक
जानेवारी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील (Border-Gavssjkar Trophy) उर्वरित दोन टेस्ट जानेवारी महिन्यात होतील. या सीरिजमधील तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरु होणार आहे. तर चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाईल.
फेब्रुवारी-मार्च
ऑस्ट्रेलिया सीरिज संपल्यानंतर टीम इंडियाला मायदेशात इंग्लंडचा सामना करावा लागेल. 4 टेस्ट, 3 वन-डे आणि 5 T20 अशा भरगच्च दौऱ्यावर इंग्लंडची टीम भारतामध्ये येणार आहे.
( वाचा : Explained: मेलबर्न टेस्टमधील भारताचा विजय का खास आहे? )
एप्रिल आणि मे
इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा चौदावा सिझन एप्रिल आणि मे महिन्यात खेळवला जाईल. पुढच्या सीझनपासून दहा टीम खेळणार असल्यानं आठ टीमसह खेळवला जाणारा हा शेवटचा सिझन असेल. IPL चा 13 वा सिझन कोरोना व्हायरसमुळे युएईमध्ये झाला होता. आता 14 वा सिझन हा भारतामध्ये होणार आहे.
जून – जुलै
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध 3 वन-डे आणि 5 T20 ची सीरिज खेळेल. त्यानंतर श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कप 2021 (Asia Cus 2021) स्पर्धेत सहभागी होईल. या स्पर्धेत गतविजेत्या भारतासमोर यजमान श्रीलंकेसह पाकिस्तान आणि बांगलादेश यांचं आव्हान असेल.
( वाचा : ‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’ )
जुलै
भारत आशिया कप स्पर्धेनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात मर्यादीत ओव्हर्सच्या मॅच होतील. कोरोना व्हायरसमुळे 2020 साली हा दौरा रद्द झाला होता.
ऑगस्ट-सप्टेंबर
इंग्लंडच्या टीमचा घरच्या मैदानात सामना केल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भारतीय टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच टेस्ट खेळल्या जातील. टीम इंडियासाठी 2021 मधील हे एक खडतर आव्हान असेल.
ऑक्टोबर
T20 वर्ल्ड कप स्पर्धा (T20 World Cup 2021) ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होणार आहे. या स्पर्धेत यजमान भारतीय टीम विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. 2007 नंतर या प्रकारातील वर्ल्ड चॅम्पियनशीपची प्रतीक्षा संपवण्याची उत्तम संधी यावर्षी टीम इंडियाकडे आहे.
या वर्ल्ड कपपूर्वी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेची टीम भारतात काही मर्यादीत ओव्हर्सच्या मॅच खेळणार आहे.
नोव्हेंबर – डिसेंबर
T20 वर्ल्ड कप नंतर भारतामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिज आहे. 2 टेस्ट आणि 3 T20 ची ही सीरिज आहे.
न्यूझीलंड दौऱ्यानंतर डिसेंबर महिन्यात भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होईल. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेतील ‘बॉक्सिंग डे’ (Boxing Day) टेस्टनंतर टीम इंडियाचं भरगच्च क्रिकेटचं वर्ष संपेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.
You must be logged in to post a comment.