फोटो – ट्विटर, विस्डेन इंडिया

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ म्हणजेज रोहित शर्मा (Rohit Sharma) आता लिमेटेड ओव्हर्स क्रिकेटमधील दोन्ही टीमचा पूर्णवेळ कॅप्टन बनला आहे. त्याची वन-डे टीमच्या कॅप्टनपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजपासून (India vs South Africa ODI Series 2022) वन-डे टीमची जबाबदारी सांभाळेल. न्यूझीलंड विरुद्ध्या सीरिजमध्ये 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत त्याने T20 टीमच्या कॅप्टनसीची जोरदार सुरूवात केली आहे. आयसीसी स्पर्धा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणे हे रोहित शर्मासमोर कॅप्टन म्हणून मोठे आव्हान असणार आहे. रोहितकडे ही स्पर्धा जिंकण्याची योजना (Rohit on ICC Tournament) तयार आहे. कॅप्टन होताच एका मुलाखतीमध्ये त्याने ती जाहीर केली आहे.

टीम इंडियाचा पराभव का होतो?

रोहित शर्माने क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ICC स्पर्धांमधील टीम इंडियाच्या पराभवातील साम्य सांगितले आहे. टीम इंडियाला 2013 नंतर एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. ही स्पर्धा जिंकण्यात आलेले अपयश हे विराट कोहलीला (Virat Kohli) कॅप्टनपदावरून हटवण्याचे मुख्य कारण आहे.

रोहितलाही याची कल्पना आहे. त्यामुळेच त्याने या स्पर्धेत विजयी होण्याची योजना (Rohit on ICC Tournament) तयार केली आहे. रोहितच्या योजनेची 100 टक्के अंमलबजावणी झाली तर टीम इंडियाला ICC वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळणार हे नक्की आहे.    

‘आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 साली झालेला वर्ल्ड कप आणि अगदी या वर्षी झालेला T20 वर्ल्ड कप देखील मॅचच्या सुरुवातीला केलेल्या चुकांमुळे हरलो. टीम भविष्यकाळात अगदी खराब परिस्थितीसाठी देखील सज्ज असेल, याची खबरदारी मी घेणार आहे. आम्हाला 3 आऊट 10 या परिस्थितीसाठी सज्ज राहावे लागेल.’ असे रोहितने (Rohit on ICC Tournament) सांगितले.

T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या अपयशाची 5 मुख्य कारणं

…. तीन्ही पराभवातील समानता

‘3 आऊट 10 असा स्कोअर असेल तर 180-190 रन होऊ शकत नाहीत असे कुठेही लिहिलेले नाही. हे मिडल ऑर्डरच्या बॅटर्सनी लक्षात ठेवले पाहिजे. कल्पना करा की, आम्ही सेमी फायनल खेळत आहोत आणि पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आमची अवस्था 2 आऊट 10 झाली आहे. त्यावेळी आम्ही काय करणार? आमच्याकडे कोणता प्लॅन आहे. त्या परिस्थितीमध्ये आम्ही स्वत:ला पुन्हा ठेवून त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. वर्ल्ड कपपूर्वी आमच्या हातात काही मॅच आहेत. त्याचा आम्ही सर्वोत्तम उपयोग करणार आहोत.  

टीम इंडियाच्या तीन्ही स्पर्धांमधील पराभवात ही समानता आहे. ICC स्पर्धांमधील पाकिस्तान विरुद्धच्या दोन मॅच आणि न्यूझीलंड विरुद्धची मॅच आम्ही याच पद्धतीने हरलो. त्या मॅचमध्ये बॉलिंगचा दर्जा असमान्य होता, हे मला मान्य आहे. पण हे आता तीन वेळा घडले आहे. चौथ्या वेळी घडणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे.’ असे रोहितने या मुलाखतीमध्ये (Rohit on ICC Tournament)  स्पष्ट केले.

‘ती’ गोष्ट बदलली पाहिजे

रोहित शर्मा यावेळी पुढे म्हणाला की, ‘आम्हाला या प्रकारच्या परिस्थीतून बाहेर पडण्यासाठी योजना तयार करावी लागेल. 2 आऊट 10 असा स्कोअर झाल्यानंतरही हा बॅटर या प्रकारचा फटका का लगावत आहे, असा विचार लोकांनी, फॅन्सनी करावा असे मला वाटत नाही.

EXPLAINED: रोहित शर्मा यशस्वी कॅप्टन असल्याची 5 प्रमुख कारणं

टीममधील प्रत्येक खेळाडूचा खेळ हा एका योजनेचा भाग आहे, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. टीममधील बॅटर्स आणि बॉलर्सनाही नैसर्गिक खेळ करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण याचा अर्थ त्यांनी टीमचा प्लॅन सोडून स्वत:च्या पद्धतीने खेळ करावा असा होत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. ही परिस्थिती नक्की बदलेल ’ असा विश्वास रोहितने व्यक्त केला (Rohit on ICC Tournament) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: