फोटो – ट्विटर, बीसीसीआय

टेस्ट क्रिकेटमध्ये 2021 हे वर्ष टीम इंडियासाठी चांगले गेले. घरच्या मैदानावरील टीम इंडियाचा दबदबा कायम राहिलाच. त्याचबरोबर विदेशातील मैदानावरही टेस्ट क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं झेंडा फडकावला. जानेवारीत ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेला टीम इंडियाचा विजयाचा (Team India Winning Moment) प्रवास डिसेंबरच्या अखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेत येईपर्यंत कायम राहिला. आफ्रिकेविरुद्ध झालेली ‘बॉक्सिंग डे’ही टीम इंडियाने जिंकली. टीम इंडियाचा जगभरातील धडाका पाहून पाकिस्तानीही थक्क झाले गेले आहेत. पाकिस्तानी टीमची तुलना करत टीम इंडिया बेस्ट असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

विराट-पुजारा-रहाणे फ्लॉप

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा त्यांच्या होमग्राऊंडवर टेस्ट सीरिजमध्ये पराभूत केले. त्यानंतर इंग्लंडमध्येही टेस्ट सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. होमग्राउंडवर न्यूझीलंडचाही फडशा पाडला आणि दक्षिण आफ्रिकेमध्येही 29 वर्षांतर ऐतिहासिक कामगिरी करत सेंच्युरियन टेस्ट जिंकण्याचा कारनामा केला. विराट कोहली (Virat Kohli), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे तिघेही विशेष फॉर्मात नसतानाही टीम इंडियाने हे विजय मिळवून दाखवले हे विशेष.

पाकिस्तानी खेळाडूकडून बोर्डाची पोलखोल, फिक्सिंगबाबत केला गंभीर आरोप

विराटला गेल्या दोन वर्षांपासून टेस्टमध्ये सेंच्युरी झळकवता आलेली नाही. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराही सुमार फॉर्मात आहेत. रहाणेने 2020-21 मध्ये 13 टेस्ट खेळल्या आणि 20.82 च्या एव्हरेजने 479 रन केल्या, तर पुजाराने 14 टेस्टमध्ये 28.08 च्या एव्हरेजने 702 रन केल्या. प्रमुख बॅटर फॉर्मात नसतानाही टीम इंडियाने मिळवलेले यश (Team India Winning Moment) पाहून हसन चिमाने कौतूक केले आहे. यासाठी त्याने एक डायलॉगही वापरला आहे. ‘जहां हमारे सपने पुरे होते है, वहा इनका स्ट्रगल शुरू होता है’, हा डायलॉग वापरत पाकिस्तानी क्रीडा विश्लेषक हसन चिमा (Hassan Cheema) यांनी ट्विट केले आहे.

पाकिस्तानला विजयाची प्रतिक्षा

टीम इंडियाने जिथे ऑस्ट्रेलियासारख्या टीमला त्यांच्या घरात जाऊन सलग दोन वेळा पराभूत केले तिथे पाकिस्तानची टीम 70 वर्षात एकदाही ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. घरच्या मैदानावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवले आहे, मात्र ऑस्ट्रेलियाने 1998-99 नंतर पाकिस्तानचा दौराही केलेला नाही.

प्रमुख टीमची 2021 मधील कामगिरी

देशटेस्टविजयपराभवड्रॉ
भारत14833
पाकिस्तान9720
इंग्लंड15492
ऑस्ट्रेलिया5311

ऑस्ट्रेलिया घरात जाऊन हरवले

2021 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (IND vs AUS 2021) गेलेल्या टीम इंडियाने इतिहास (Team India Winning Moment) रचला. पहिल्या दोन टेस्ट गमावल्यानंतर टीम इंडियाने कमबॅक करत पाच टेस्टची सीरिज 2-1 अशी खिशात टाकली. गाबामध्ये वाशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी केलेली खेळी टर्निंग पाईंट ठरली होती.

इंग्लंडचा फडशा

ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडच्या टीमचे दातही टीम इंडियाने घशात (Team India Winning Moment) घातले. आधी होमग्राउंडवर 3-1 ने विजय आणि नंतर इंग्लंडमध्ये जाऊन 2-1 ने आघाडी टीम इंडियाने (IND vs ENG 2021) घेतली. टीम इंडिया सहज पराभूत होईल अशा वल्गना करणाऱ्या इंग्लंडच्या प्लेअरला त्यामुळे तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही. आता कोव्हिडमुळे सीरिजमधील पाचवी टेस्ट 2022 मध्ये खेळली जाईल.

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनमध्येही टीम इंडियाने टेस्ट मॅच जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बालेकिल्ल्यात टेस्ट जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश आहे. पाकिस्तानने 2021 मधील विजय हे एकाही अव्वल देशाविरुद्ध मिळवलेले नाहीत. इंग्लंड विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये तर B टीमनं त्यांचा पराभव केला होता. भारतीय टीमच्या तुलनेत आपल्याला अजून बराच प्रवास करायचा आहे, याची जाणीव आता पाकिस्तानच्या क्रीडा विश्लेषकांनाही होत आहे. त्यामुळेच चीमा यांनी डायलॉग वापरत आपले दु:ख व्यक्त केले आहे.

पाकिस्तानात खेळण्याची कुणाची तयारी का नसते?, PCB च्या CEO ने दिली मोठी कबुली

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: