फोटो – The Hundred

T20 क्रिकेट हा तरुणांचा खेळ आहे, अशी एक समजूत आहे. T20 पेक्षा देखील वेगवान असा 100 बॉलचा ‘द हंड्रेड’ (The Hundred) हा क्रीडा प्रकार इंग्लंडमध्ये सुरु झाला आहे. तो प्रकार देखील प्रामुख्यानं क्रिकेटला अधिक फास्ट करण्यासोबतच तरुणांना आकर्षित करण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. या स्पर्धेतील पहिल्या हॅट्ट्रिकची नोंद 42 वर्षांच्या बॉलरनं केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी स्पिनर इम्रान ताहीरने (Imran Tahir) वयाच्या 42 व्या वर्षी 19 बॉलमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये हॅट्ट्रिकचाही (Imran Tahir Hat-Trick) समावेश आहे.

स्पर्धेतील पहिला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर ताहीर जगभरातील T20 लीगमध्ये सक्रीय आहे. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत तो बर्मिंगहम फिनिक्स टीमचा सदस्य आहे. वेल्श फायर टीमविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं फक्त 19 बॉलमध्ये वेल्शची निम्मी टीम आऊट केली. यामध्ये या स्पर्धेतील पहिल्या हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.

ताहीरनं मॅचमधील 72 ते 74 बॉलवर अहमद, मॅट मिल्नेस आणि डेव्हिड पायने या तिघांना आऊट करत हॅट्ट्रिक (Imran Tahir Hat-Trick) पूर्ण केली. त्याशिवाय त्यानं ग्लेन फिलिप्स आणि लेसूय डू प्लोय यांनाही आऊट केले.

ताहीरच्या या स्पेलमुळे बर्मिंगहॅमनं दिलेलं 185 रनचं आव्हान वेल्शला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 91 रनवर ऑल आऊट झाली. बर्मिंगहॅमकडून विल्स समीदनं 38 बॉलमध्ये नाबाद 65 तर कॅप्टन मोईन अलीनं (Moeen Ali) 28 बॉलमध्ये 59 रनची आक्रमक खेळी केली.

बर्मिंगहॅम फिनिक्सनं या विजयासह पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांचा 6 मॅचमध्ये हा चौथा विजय असून ते ट्रेंट रॉकेट्ससह पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. तर वेल्श फायरची टीम सध्या सर्वात तळाला आहे. त्यांना सहापैकी फक्त 2 मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे.  

Explained: क्रिकेटचा नवा प्रकार The Hundred चे नियम आणि काय आहे IPL पेक्षा वेगळेपण?

CSK साठी Good News

इम्रान ताहीर इंग्लंडमध्ये 2019 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपनंतर (Cricket World Cup 2019) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. तो सध्या आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा सदस्य आहे. आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या ताहीरनं आजवर 59 मॅचमध्ये 82 विकेट्स घेतल्या आहेत. 2019 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलरला देण्यात येणाऱ्या पर्पल कॅपचा ताहीर मानकरी ठरला होता.

इम्रान ताहीरने पाकिस्तान का सोडले?

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा चौदावा सिझन (IPL 2021) स्थगित होण्यापूर्वी ताहीरला फक्त 1 मॅचमध्ये संधी मिळाली होती. त्यामध्ये त्यानं 2 विकेट्स घेतल्या. आता आयपीएलचा उर्वरित टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वी हॅट्ट्रिकसह ( Imran Tahir Hat-Trick) 5 विकेट्स घेत ताहीरं फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याचा हा फॉर्म सीएसकेसाठी आनंदाची बातमी आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: