फोटो – ट्विटर, आयसीसी

जगभरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मृत्यूला अनेक वर्ष उलटल्यानंतरही त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत आजही मतभेद आहेत. त्यांच्या मृत्यूबाबत तपास यंत्रणांचे रिपोर्ट उपलब्ध आहेत. पण त्यावर अनेकांचा विश्वास नाही. त्या मृत्यूबाबत वेगवेगळे प्रवाद प्रचलित आहेत. यापैकी एक मृत्यू क्रिकेट विश्वातील आहे. जो आजच्या दिवशी 2007 (On This Day, 2007)  साली झाला. पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेत (Cricket World Cup 2007) दुबळ्या आयर्लंडनं पराभव केला. तो पराभव धक्कादायक होता. पण त्यापेक्षाही त्या पराभवाच्या रात्री पाकिस्तान टीमचे त्या वर्ल्ड कपमधील कोच बॉब वूल्मर (Bob Woolmer) यांचा हॉटेलमधील रूममध्ये संशयास्पद मृत्यू (The Woolmer Files) झाला.

त्या रात्री काय झाले?

वेस्ट इंडिजमध्ये 2007 साली झालेला वर्ल्ड कप पाकिस्तान टीमसाठी निराशाजनक ठरला. वर्ल्ड कपमधील पहिल्या मॅचमध्ये यजमान वेस्ट इंडिजनं पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर 17 मार्च रोजी झालेल्या पाकिस्तानच्या दुसऱ्या मॅचमध्ये दुबळ्या आयर्लंडनं पाकिस्तानला धक्का दिला.

पहिल्यांदा बॅटींग करायला आलेल्या पाकिस्तानची इनिंग फक्त 132 रनवर आटोपली. त्यानंतर आयर्लंडनं 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या पराभवानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये वूल्मर यांनी पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपल्याचं मान्य केलं होतं. तसंच आयर्लंडसमोर लोटांगण घालणाऱ्या बॅटर्सवर नाराजी व्यक्त केली होती. या पराभवानंतर वूल्मर यांची कोच पदावरून हकालपट्टी होणार अशी चर्चा होती. त्यांनी पत्रकार परिषदेत यावर काहीही बोलण्यास नकार दिला. ‘I would like to sleep on my future as a coach’, असे वूल्मर शेवटच्या पत्रकार परिषदेत म्हणाले (The Woolmer Files) होते.

वूल्मर यांच्या त्या वाक्याला काही तासांनी वेगळाच संदर्भ प्राप्त झाला. त्या रात्री हॉटेलमधील रूममध्ये झोपण्यासाठी गेलेले वूल्मर नंतर कधी उठलेच नाहीत.

आयर्लंडची क्रिकेट विश्वात सनसनाटी एन्ट्री, पाकिस्तानची धक्कादायक हार

पोलिसांनी काय सांगितलं?

जमेकामधील हॉटेलच्या रूममध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी वूल्मर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. क्रिकेट कोचिंगला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवं वळण देणारा एक कल्पक कोचचा हॉटेलीमधील खोलीत मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली.

22 मार्च रोजी जमेका पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर वूल्मर यांच्या मृत्यूला वेगळच वळण लागलं. तपास अधिकाऱ्यांनी वृल्मर यांची हत्या झाली असू शकते, असा दावा केला. त्यांना विष दिलं का? कोणत्या हिटमॅननं त्यांना मारले का? एकापेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून त्यांची हत्या केली का? मॅच फिक्सिंगशी संबंधित गटानं नाराज होऊन त्यांचा जीव घेतला का? या प्रकराचे वेगवेगळे प्रश्न तपास अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. यापैकी कोणतीही शक्यता तपास अधिकाऱ्यांनी त्या पत्रकार परिषदेत नाकारली (The Woolmer Files) नव्हती.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर संशय

पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. 24 मार्च रोजी पाकिस्तानची टीम लंडनचं विमान पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचली. त्यावेळी पाकिस्तानचा तत्कालीन कॅप्टन इंझमाम उल हक (Iinzamam-ul- Haq)  असिस्टंट कोच मुश्ताक अहमद आणि टीम मॅनेजर तलत अली यांना विमानतळावरच अडवण्यात आले.

पाकिस्तान टीमच्या कॅम्पमधील कुणी वूल्मर यांचा खून केला का? हा प्रश्न तेव्हा मीडियात विचारला जात होता. आयर्लंड विरूद्धच्या पराभवानंतर हॉटेलमध्ये परत येताना टीम बसमध्ये काही खेळाडूंशी वाद झाला, असे सांगण्यात येत होते. मॅच फिक्सिंगशी संबंध असणाऱ्या गटानं वूल्मर यांना संपवले ही सर्वात प्रबळ थिअरी (The Woolmer Files) होती. या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी पाकिस्तान टीममधील तीन वरिष्ठ व्यक्तींना विमानतळावर अडवण्यात आले. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर 24 तासांनी त्यांना जमेका सोडण्याची परवानगी देण्यात आली.

अधिकृत कारण काय?

जमेकाच्या पोलीस कमिशनरांनी 12 जून 2007 रोजी पत्रकार परिषद घेऊन वूल्मर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे जाहीर केले. त्यांच्या शरीरावर कोणत्याही संशयास्पद जखमा आढळल्या नाहीत. या संबंधी यापूर्वी व्यक्त केलेले सर्व संशय निराधार आहेत. वूल्मर यांचा डायबेटीस, वाढलेला तणाव या सर्व गोष्टी त्यांच्या नैसर्गिक मृत्यूचं कारण असू शकतात असं जमेका पोलिसांच्या प्रमुखांनी सांगितलं. त्यांनी या प्रकरणाची तपास फाईल बंद करत (The Woolmer Files) असल्याची घोषणा केली.

मृत्यूचे तबलिगी कनेक्शन?

जमेका पोलिसांनी फाईल बंद केली. त्यानंतरही वूल्मर यांच्या मृत्यूच्या कारणांवरील चर्चा थांबलेली नाही. वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचे पत्रकार आमिर मीर यांनी एक लेख लिहला होता. त्यामध्ये पाकिस्तान टीममध्ये ‘तबलिगी जमात’ या संघटनेचा प्रभाव वाढला होता. कॅप्टन इंझमामसह टीमचे प्रमुख सदस्य या संघटनेचे सदस्य होते.’ असे स्पष्ट करण्यात आले होते.

‘एकत्र नमाज आणि प्रार्थना करून आलेल्या शक्तीनं आपण मॅच जिंकू’ असा या सदस्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते नीट प्रॅक्टीसमध्येही सहभागी होत नसत. पाकिस्तान टीमसोबत काही मौलवी देखील प्रवास करत असत. तबलिगी जमातीच्या प्रभावाखाली असलेल्या इंझमामशी वूल्मर यांचं पटत नव्हतं. त्यांचे वारंवार खटके उडत असत, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.

पाकिस्तानची वर्ल्ड कपमधील खराब कामगिरी, आयर्लंडकडून झालेल्या पराभवामुळे वूल्मर नाराज झाले होते. त्यांनी पाकिस्तान टीममधील तबलिगींची कानउघडणी केली होती. त्यानंतर त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. वूल्मर यांच्या मृत्यूचे तबलिगी कनेक्शन असल्याचा संशय (The Woolmer Files) पोलिसांच्या तपासाच्या वेळी देखील व्यक्त करण्यात आला होता.

पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते?

माजी क्रिकेटपटूंना संशय

बॉब वूल्मर यांची हत्या करण्यात आली असा दावा दक्षिण आफ्रिकेचे माजी कॅप्टन क्लाईव्ह राईस यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. त्यांनी मॅच फिक्सिंग करणाऱ्या गँगवर संशय व्यक्त केला होता. त्या काळातील काही मॅचमध्ये पाकिस्तानचे सर्व खेळाडू कॅच आऊट झाले होते. हे संशायस्पद होते, असा दावा राईस यांनी केला होता.  

वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान अशा प्रकारची हत्या झाली हे जाहीर करणे आयोजकांच्या हिताचे नव्हते. दक्षिण आफ्रिकेत वूल्मर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेन करण्यात आले नाही, ही मोठी चूक होती. असा दावा राईस यांनी केला (The Woolmer Files) आहे.

Mohammad Yousuf On Islam: ‘2006 चा जबरदस्त फॉर्म हे इस्लाम स्विकारल्याबद्दल अल्लाहने दिलेले बक्षीस’

The Woolmer Files

बॉब वूल्मर यांच्या मृत्यूला आता 15 वर्ष झाली आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय टीमच्या कोचचा मृत्यू होतो. तो नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचं तपास अधिकारी जाहीर करतात. अगदी पाकिस्तान टीममधील खेळाडूंवरही संशय व्यक्त केला जातो. त्यानंतर काही महिन्यांमध्ये या प्रकारात सर्वांना क्लीनचीट मिळते. त्यांच्या मृत्यूची फाईल बंद केली जाते. क्रिकेट विश्वातील हे एक अत्यंत संशयास्पद प्रकरण आहे.

वूल्मर यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचं आजही अनेकांच मत आहे. त्या सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन ही वूल्मर फाईल (The Woolmer Files) ओपन केली. नव्यानं तपास केला तर कदाचित काही नवी माहिती देखील उजेडात येऊ शकते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: