
ऑस्ट्रेलियातील आयपीएल (IPL) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) यंदा नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. बिग बॅश लीग स्पर्धा (BBL 2020-21) 10 डिसेंबरपासून सुरु होणार असून या स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. खेळातील रंजकता वाढवण्यासाठी या नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे.
पॉवर सर्ज
T20 क्रिकेटमध्ये साधारणपणे पहिले सहा ओव्हर्स पॉवर प्ले असतो. आता पॉवर सर्जनुसार याचे विभाजन करण्यात आले. नव्या नियमानुसार पहिले चार ओव्हर्स पॉवर प्ले असेल. उर्वरित दोन ओव्हर्सचा पॉवर प्ले 11 व्या ओव्हर्सनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला कधीही घेता येईल.
एक्स फॅक्टर
क्रिकेटमधील जुन्या ‘सुपर सब’ नियमामध्ये काही बदल करुन हा नियम तयार करण्यात आलाय. मॅचमधील 10 वी ओव्हर संपल्यानंतर प्लेईंग इलेव्हलमध्ये एक बदल करण्याची मुभा टीमला असेल.
ज्या खेळाडूला बदलयाचे असेल त्याने तोपर्यंत मॅचमध्ये बॅटिंग केलेली नसावी किंवा एक ओव्हरपेक्षा जास्त ओव्हर बॉलिंग केलेली नसावी.
अतिरिक्त बोनस पॉईंट
या नियमानुसार एका मॅचसाठी चार पॉईंट्स असणार आहेत. त्यापैकी 3 पॉईंट हे विजयी टीमला देण्यात येतील. तर उर्वरीत एक पॉईंट हा 10 ओव्हरनंतर ज्या टीमचा स्कोअर जास्त असेल त्या टीमला देण्यात येईल.
बिग बॅश स्पर्धेत एकूण आठ टीम खेळणार असून स्पर्धेची फायनल 6 फेब्रुवारीला होणार आहे. भारतामध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेनंतर ही दुसऱ्या क्रमांकाची प्रतिष्ठीत देशांतर्गत T20 स्पर्धा समजली जाते.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.