
18 जानेवारी 2015 हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात कधीही विसरला जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेचा तेंव्हा कॅप्टन एबी डीव्हिलियर्सनं (Ab de Villiers) त्या दिवशी अनेक विक्रम केले. वेस्ट इंडिजविरुद्ध डीव्हिलियर्स त्या दिवशी इतका भारी खेळला की ‘हा माणूस आहे की एलियन?’ ( ABD Human or Alien) असा प्रश्न अनेकांना पडला होता.
जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या (West Indies) वन-डे मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकला. त्या दिवशी वेस्ट इंडिजच्या मनासारखी झालेली ती एकमेव गोष्ट होती. हशिम अमला (Hashim Amla) आणि रोसवू जोडीनं पहिल्या विकेटसाठी 247 रन्सची पार्टरनरशिप केली. रोसवूनं पहिली तर अमलानं 18 वी वन-डे सेंच्युरी झळकावली. रोसवू 128 रन्स काढून आऊट झाला.
डिव्हिलियर्स लवकर येणार नव्हता!
रोसवू आऊट झाला आणि मैदानात डीव्हिलियर्सचं वादळ दाखल झालं. वास्तविक दक्षिण आफ्रिकेला मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवण्यासाठी डेव्हिड मिलरला (David Miller) तिसऱ्या क्रमांकावर बढती द्यावी असा कॅप्टन डीव्हिलियर्सचा विचार होता. त्याने तो विचार दक्षिण आफ्रिकेचे तेंव्हाचे कोच रसेल डोमिंगो यांना बोलूनही दाखवला होता. पण, डोमिंगो यांना डीव्हिलियर्सचे मत पटले नाही. त्यांनी डीव्हिलियर्सलाच तिसऱ्या क्रमांकावर जाण्याचा सल्ला दिला.
राहुल द्रविडच्या 49 अद्भुत गोष्टी!
डीव्हिलियर्स मैदानात आला आणि अनेक नवे रेकॉर्ड तयार झाले. त्याने सुरुवातीला फक्त 16 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी झळकावली. डीव्हिलियर्सने वेगवान हाफ सेंच्युरीचा 19 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला. वेगवान हाफ सेंच्युरी ही सुरुवात होती. आता डीव्हिलियर्सच्या बॅटला रनची चटक लागली होती. त्याने 31 बॉल्समध्ये सेंच्युरी करत वन-डे मॅचमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरीचा (Human or Alien) रेकॉर्डही केला. डीव्हिलियर्स आऊट झाला तेंव्हा त्याने 44 बॉल्समध्ये 149 रन्स केले होते. 9 फोर आणि 16 सिक्सर्सच्या मदतीनं त्यानं ही इनिंग खेळली. एका वन-डे इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्सर्स मारण्याच्या रोहित शर्माच्या (Rohi Sharma) विक्रमाची डीव्हिलियर्सनं त्या दिवशी बरोबरी केली. रोहित शर्मानं 16 सिक्सर्स लगावताना डीव्हिलियर्सपेक्षा 115 रन्स जास्त काढले होते.
डीव्हिलियर्सचे सर्व रेकॉर्ड, सिक्स, फोर विसरा… फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा तो त्या दिवशी 39 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला होता. त्यामुळेच त्याची ती खेळी पाहून डीव्हिलियर्स माणूस आहे की एलियन? (ABD Human or Alien) असा अनेकांना प्रश्न पडला होता.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.