फोटो – ट्विटर, फॉक्स क्रिकेट

अ‍ॅशेस सीरिजमधील पहिली टेस्ट तोंडावर आली आहे, आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम (Australia Cricket Team)  अडचणीत आली आहे. टीम पेननं (Tim Paine) ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. चार वर्षांपूर्वी महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचं प्रकरण सार्वजनीक झाल्यानं त्याला राजीनामा (Tim Paine Sexting Scandal) द्यावा लागला. त्याच्या जागेवर अद्याप नव्या कॅप्टनची नियुक्ती झालेली नाही. या सर्व प्रकरणाबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं (Michael Clare on Australia Captain) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला घरचा आहेर दिला आहे.

कुणाची नावं आघाडीवर?

टीम पेननं राजीनामा दिल्यानंतर माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि सध्याच्या टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन पॅट कमिन्स (Pat Cummins) ही नावं कॅप्टनपदासाठी आघाडीवर आहेत. त्या दोघांनीही यासाठी मुलाखत देखील दिली आहे. टीम पेनची स्मिथच्या जागेवरच कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली होती. स्मिथला 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सँडपेपर वादामुळे कॅप्टनसी सोडावी लागली. त्याचबरोबर एक वर्षांची बंदी देखील त्याने भोगली आहे.

मायकल क्लार्कनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पद्धतीवर टीका करत स्वच्छ प्रतिमेचा अतिरेकी आग्रह धरला तर पुढील 15 वर्ष कॅप्टनपदालाठी वाट पाहत बसावं लागेल, अशी टीका केली आहे. टीम पेननं 2017 मधील प्रकरणावर आत्ता राजीनामा दिल्यानं देखील त्यानं नाराजी (Michael Clare on Australia Captain) व्यक्त केली आहे.

‘मी रिकी पॉन्टिंगला वाचवले’, ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टनचा गौप्यस्फोट

‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडं अन्य कोणता पर्याय नसेल तर पेननं त्यांना प्रश्न विचारयला हवा होता. त्यानं चार वर्षांपूर्वी सर्व प्रकरणाची माहिती दिली होती. त्यावेळी तो प्रामाणिक होता. आता प्रकरण सार्वजनिक झाल्यावर तो अप्रमाणिक कसा झाला? त्यामुळे नियम थोडेच बदलणार आहेत? मला वाटत नाही, असं काही होईल. क्रिकेट टस्मानिया देखील हेच सांगत आहे.’ असं क्लार्कनं स्पष्ट केलं.

पॉन्टिंगचं दिलं उदाहरण

मायकल क्लार्कनं यावेळी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये खराब सुरूवात केल्यानंतरही महान कॅप्टन बनलेल्या रिकी पॉन्टिंगचं (Ricky Ponting) उदाहरण दिलं. ‘मी क्रिकेट खेळलो त्या काळाचा विचार करा, रिकी पॉन्टिंगकडे पाहा. असं काही तेव्हा असतं तर पॉन्टिंग कधीही कॅप्टन बनला नसता. तो देखील सुरुवातीला चुकला होता. त्यामुळे तुम्ही त्याला जबाबदारी देणार नाहीत का? हे एक चांगलं उदाहरण आहे. वेळ, अनुभव, इंटरनॅशन क्रिकेट खेळणे आणि कॅप्टनसी या सर्वांमुळे पॉन्टिंगमध्ये बदल झाला.’ असं क्लार्कनं सांगितलं.

काही निकष नक्की असावे. पण, तो बदलू शकतो, अधिक समजदार होऊ शकतो यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. खेळाडूंना दिला जाणारा पाठिंबा आता कुठे आहे?  असा प्रश्नही क्लार्कनं विचारला (Michael Clare on Australia Captain) आहे.

पेनच्या जागी कोण?

अ‍ॅशेस सीरिजमधील (Ashes Series 2021-22) पहिली टेस्ट 8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियानं या टेस्टसाठी निवडलेल्या टीममध्ये टीम पेन हा एकच स्पेशालिस्ट विकेट किपर आहे. पण, पेनचं ही टेस्ट खेळणे अनिश्चित असल्याचं ऑस्ट्रेलियन टीमच्या निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ब्रिस्बेन टेस्टमध्ये पेनच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न देखील कायम आहे.

‘होय, मी मुर्ख ठरलो’, सर्व बाजूनं अडकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनची कबुली!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: