फोटो – ट्विटर/मीराबाई चानू

2 ऑगस्ट 2021 हा दिवस भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. भारतीय महिला टीमनी (Indian Women’s Hockey Team) ऑलिम्पिक इतिहासामध्ये पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश (Hockey Team in  Semi Final) केला आहे. भारतीय टीमनं संपूर्ण तीन वेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा क्वार्टर फायनलमध्ये 1-0 नं पराभव केला. देशाची पहिली महिला ड्रॅग फ्लिकर असलेल्या गुरजीत कौरनं (Gurjit Kaur) पहिल्या हाफमध्ये केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर भारतानं हा इतिहास रचला आहे.

तो टीमचा गोल होता!

ऑस्ट्रेलिनं टीम ही वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसऱ्या तर भारतीय टीम ही नवव्या क्रमांकावर आहे. रँकींगमधील हा फरक मैदानावर कुठंही दिसला नाही. भारतानं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीनं खेळ केला. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक चालीचे भारताकडे उत्तर होते.

मॅचच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला अखेर ती संधी मिळाली. गुरजीत कौरनं पेनल्टी कॉर्नरवर ऑस्ट्रेलियन टीमचा बचाव भेदत गोल केला. गुरजीतचा हा ऑलिम्पिकमधील पहिला गोल आहे. तिनं सर्वात महत्त्वाच्या क्षणी तो गोल (Hockey Team in Semi Final) केला.

या ऐतिहासिक गोलनंतर गुरजीतनं हा गोल संपूर्ण टीमचा असल्याची भावना व्यक्त केली आहे. ‘तो फक्त माझ्या एकटीचा गोल नव्हता. तो संपूर्ण टीमचा गोल होता. त्यांनी मला संधी दिली. त्यानंतर पुढील काम करण्याची जबाबदारी माझी होती. ती 60 मिनिटं आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची 60 मिनिटं होती. आम्ही आमच्या आयुष्तील शेवटची मॅच असल्यासारखं या 60 मिनिटामध्ये खेळलो. आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास होता. आम्ही सर्वजणी टीम म्हणून एकत्र खेळलो. हेच आमच्या यशाचे सर्वात मोठे रहस्य आहे.’ असे गुरजीतने सांगितले.  

The Great Wall of India

ऑस्ट्रेलियाच्या टीमनं ऑलिम्पिकच्या साखळी सामन्यांमध्ये 13 गोल केले होते. ऑस्ट्रेलियाला  मॅचमध्ये नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी एकदाही अगदी एकदाही ऑस्ट्रेलियाला गोल करता आला नाही. भारताची गोल किपर आणि व्हाईस कॅप्टन सविता पूनियानं (Savita Punia) हे सर्व हल्ले परतवून (Hockey Team in Semi Final) लावले.

सवितानं आम्हला क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशीच खेळायचं होतं, असं सांगितलं. ‘आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध यापूर्वी अनेकदा खेळलो आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांचा खेळ माहिती होता. त्यांनी आम्हाला स्पेस दिला. आम्ही त्याची संधी साधली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही गोल केले असले तरी आमची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. त्यामुळे आम्ही आज डिफेन्सवर भर दिला. एक गोलची आघाडी मिळाल्यानंतर एक सीनिअर खेळाडू आणि गोल किपर म्हणून मी माझं डोकं शांत ठेवून खेळ केला.’ असं सविता या मॅचनंतर म्हणाली.

मणिपूर ते जपान, 135 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं उचलणाऱ्या मीराबाईची गोष्ट

कोचचे अश्रू बोलके

भारतीय हॉकीतील या सुवर्ण दिवसाचे श्रेय टीमचे कोच शोर्ड मरीन (Sjoerd Marijne) यांना देखील जाते. हॉलंडच्या मरीन यांनी भारतीय महिला हॉकी टीमला आजवर कधीही न मिळालेलं यश मिळवून दिलं आहे. त्यांनी टीमच्या फिटनेसवर भर दिला. त्याचा परिणाम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये दिसला. मैदानातील कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग कसा काढायचा हे शोर्ड यांनी टीमला शिकवलं. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या सर्व चाली टीमनं एकत्र येत उधळून लावल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर त्यांना अश्रू रोखता आले नाहीत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर शोर्ड यांनी सर्व भारतीयांचे आभार मानले आहेत. सध्याच्या खडतर कालखंडात देशाला आनंद साजरा करण्यासाठी हा विजय कारण ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या पुढील मॅचमध्ये देखील टीम सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केलाय. कोचचा टीमवरील आणि टीममधील खेळाडूंचा एकमेकांवर असलेल्या याच विश्वासामुळेच भारतीय हॉकीसाठी 2 ऑगस्ट 2021 हा दिवस भारतीय हॉकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी (Hockey Team in Semi Final) लिहिला गेला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: