फोटो – ट्विटर

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या पुढील सिझनसाठी (IPL 2021) 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. ऑस्ट्रेलियात नुकतीच पार पडलेल्या बिग बॅश लीग (Big Bash League 2020-21) स्पर्धा गाजवणाऱ्या कोणत्या खेळाडूंना आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे पाहूया

अ‍ॅलेक्स हेल्स ( रन 543, स्ट्राईक रेट, 161.60)

इंग्लंडच्या संघानं फुली मारलेल्या अ‍ॅलेक्स हेल्सची (Alex Hales) बॅट या स्पर्धेत जोरदार चालली. सिडनी थंडरकडून (Sydney Thunder) खेळताना हेल्सनं या सिझनमधील सर्वात जास्त 543 रन केले. यामध्ये स्पर्धेची चॅम्पियन सिडनी सिक्सर्सविरुद्ध ठोकलेल्या 51 बॉलमधील सेंच्युरीचा देखील समावेश आहे,  त्याचा स्ट्राईक रेट देखील 161.60 इतका मजबूत होता. तसंच त्यानं एका सिझनमध्ये सर्वात जास्त सिक्सर्स मारण्याचा विक्रमही केला आहे. हेल्स यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळला आहे. आता त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो या लिलावात पुन्हा एकदा मालामाल होण्याची शक्यता आहे.

ग्लेन मॅक्सवेल ( रन 379, स्ट्राईक रेट 143.56)

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये सुपर फ्लॉप गेला होता. त्यामुळे त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं (KIXP) करारमुक्त केलं आहे. या खराब कामगिरीनंतरही मॅक्सवेलला करारबद्ध करण्यासाठी आयपीएल फ्रँचायझीच्या उड्या पडण्याची शक्यता आहे.

( वाचा : IPL 2020 मधील खराब कामगिरीचे मॅक्सवेलने सांगितले कारण… )

बिग बॅश स्पर्धेत मॅक्सवेल मेलबनर्न स्टार्सचा (Melbourne Stars) कॅप्टन होता. स्टार्सचे तारे या स्पर्धेत फारसे चमकले नसले तरी मॅक्सवेलसाठी हा सिझन चांगला ठरला. त्यानं या स्पर्धेत तीन हाफ सेंच्युरीसह 379 रन केले. तसंच सात विकेट्सही घेतल्या. भारताविरुद्ध मर्यादीत ओव्हर्समधील मॅक्सवेलचा फॉर्म देखील आयपीएल ऑक्शनच्या वेळी सर्व टीम मालकांच्या डोक्यात असेल.

झाये रिचर्डसन ( विकेट्स 29, इकॉनॉमी रेट 7.69 )

पर्थ स्कॉचर्सच्या (Perth Scorchers) फायनल पर्यंतच्या प्रवासात झाये रिचर्डसनचा (Jhye Richardson) मोठा वाटा होता. त्यानं या स्पर्धेत 29 विकेट्स घेतले. त्याचबरोबर 150 पेक्षा जास्त बॉल निर्धाव देखील टाकले. त्याचबरोबर तो लोअर ऑर्डरमधील एक उपयुक्त बॅट्सन देखील आहे.   

( वाचा : SMAT: सय्यद मुश्ताक अली स्पर्धा गाजवणाऱ्या ‘या’ बॉलर्सना उघडणार IPL चे दार? )

जेम्स विन्सी ( रन 537, स्ट्राईक रेट 143.58)

बिग बॅश लीग ( (Big Bash League 2020-21) विजेत्या सिडनी सिक्सर्सचा (Sydney Sixers) बाद फेरीतील हिरो. जेम्स विन्सीच्या (James Vince) तडाखेबंद खेळीमुळे सिक्सर्सनं शेवटच्या दोन मॅचमध्ये विजय मिळवला होता. विशेषत: फायनल मॅचमध्ये त्यानं पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध 60 बॉलमध्ये 95 रन करत सिक्सर्सचं विजेतेपदावर नाव कोरण्यात मोलाची भूमिका बजावली. मोठ्या मॅचमधील त्याच्या या खेळीनं अनेक आयपीएल फ्रँचायझींच्या मनात घर केलं असणार.

अ‍ॅलेक्स कॅरी ( रन 422, स्ट्राईक रेट 122.12)

आयपीएल 2020 मध्ये अ‍ॅलेक्स कॅरीला (Alex Carey) फक्त 3 मॅचमध्ये संधी मिळाली होती. मर्यादीत संधीचं सोनं न करता आल्यानं त्याला दिल्ली कॅपिटल्सनं करारमुक्त केलं. मात्र या बिग बॅशमध्ये कॅरीनं अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) कडून खेळताना एका सेंच्युरीसह 412 रन केले. तसेच त्यानं विकेटच्या मागं देखील समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे या आयपीएल स्पर्धेतही कॅरीवर पुन्हा एकदा चांगली बोली लागण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: