फोटो – ट्विटर

टीम इंडियानं यावर्षीचा अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) जिंकला आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमवर कोरोना अटॅक झाला. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनसह अनेक खेळाडू कोरोनाग्रस्त झाले. त्यानंतरही टीम इंडियानं स्पर्धेतील सर्व मॅच जिंकत विजेतेपद पटकावले. भारतीय टीम मैदानावर यशाची पताका उंचावत असताना भारतीय खेळाडूंचे मैदानाबाहेर मात्र प्रचंड हाल (U19 Team harrowing experience) झाले.  

अडचणीची सुरूवात..

अंडर 19 टीमचे मॅनेजर लॉबजांग जी तेन्जिंग (Lobzang  G. Tenzing) यांनी ‘पीटीआय’ या न्यूज एजन्सीशी बोलताना वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्यान भारतीय टीमनं ‘कसे दिवस काढले’ याचा गौप्यस्फोट केला आहे.

तेन्जिंग यांनी सांगितले की, ‘आयर्लंड विरूद्धच्या दुसऱ्या मॅचपूर्वी खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालंय सर्वप्रथम सपोर्ट स्टाफमधील सदस्य रविचंद्रन पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर मॅनेजर तेन्जिंग आणि लॉजिस्टिक्स मॅनेजरना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर टीम इंडियासमोर प्रशासकीय अडचण उभी (U19 Team harrowing experience) राहिली.’

U19 World Cup : इंग्लंडवर भारताचे ‘राज’ टीम इंडियानं पाचव्यांदा जिंकला वर्ल्ड कप

ढिसाळ बायो-बबल

तेन्जिंग यांनी सांगितले की, ‘वर्ल्ड कप स्पर्धेच्या दरम्या कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या उपचाराची योग्य सोय नव्हती. टीम इंडियातील सपोर्ट स्टाफमधील सदस्याला बहुधा दुबईमधील आशिया कप स्पर्धेच्या दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. वेस्ट इंडिज या प्रकारच्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी तयार नव्हते. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले बायो-बबल ढिसाळ होते.

डॉक्टर आणि औषध नाही…

‘गयानामध्ये कोरनाची लागण झालेले भारतीय खेळाडू क्वारंटाईन होते. त्यावेळी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कोरोना झाला होता. त्यावेळी आमच्या मदतीसाठी तिथं कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता. आमच्यासाठी औषधंही नव्हती. हे संपूर्णपणे व्यवस्थेचं अपयश (U19 Team harrowing experience) होतं. त्यावेळी टीममधील फिजियोनं आमची मदत केली

आमच्या हॉटेलमध्ये खेळाडू आणि अन्य पाहुणे एकाच मजल्यावर राहात होते. आयसोलेशनच्या दरम्यान उपचारसाठी कुणी उपलब्ध नव्हते. प्रत्येक रूममध्ये पाणीही मिळत नव्हते. योग्य खाण्यासही मिळत नव्हते. आमचं नशीब चांगलं म्हणून तिथं जवळ हॉटेल होत. त्या हॉटेलनी आमची मदत केली.

टीम इंडियाचा विकेटकिपर वृद्धिमान साहाचा द्रविड-गांगुलीवर गंभीर आरोप, क्रिकेट विश्वात खळबळ

टीम प्रॅक्टीसच्या दरम्यान स्टेडिअमधील वॉश रूममध्येही पाणी नव्हते. बायो-बबलच्या दरम्यान (U19 Team harrowing experience) बीसीसीआय आणि स्टेट असोसिएशननं यापेक्षा चांगले काम केले होते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: