फोटो – सोशल मीडिया

वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड (Under 19 World Cup 2022) स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियानं टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये निवेतन राधाकृष्णनची (Nivetan Radhakrishnan) निवड करण्यात आली आहे. मुळचा तामिळनाडूतील मदुराईचा असलेल्या निवेतनला क्रिकेटची पार्श्वभूमी असून तो दोन्ही हाताने बॉलिंग करू शकतो.

कोण आहे निवेतन?   

निवेतन हा मुळचा तामिळनाडूचा आहे. तो 10 वर्षांचा होता तेव्हा म्हणजे 2013 साली त्याचे कुटुंब सिडनीमध्ये स्थायिक झाले. त्याच्या वडिलांनी ज्युनिअर लेव्हलला क्रिकेट खेळले आहे. त्याचबरोबर तामिळनाडू क्रिकेट लीगमधील टीमचे व्यवस्थापन देखील सांभाळले आहे. निवेतनचा मोठा भाऊ तामिळनाडूकडून अंडर 14 क्रिकेट स्पर्धेत खेळला आहे.

निवेतन अजून अंडर 19 टीममध्ये असला तरी आजवर दोन T20 लीगमध्ये खेळला आहे. तो तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) स्पर्धेत खेळला असून दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) नेट बॉलर म्हणून भूमिका बजावली आहे. TNPL स्पर्धेत त्याने आर. अश्विन आणि एस. बद्रीनाथ सारख्या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सकडून स्टॉईनिस, हेटमायर, अजिंक्य रहाणे या बॅटर्सना नेटमध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव हा खूप शिकवणारा असल्याचं निवेतननं ( Who is Nivetan Radhakrishnan) ‘क्रिकइन्फोशी’ बोलताना सांगितले.

दुबईमध्ये 2016 साली झालेल्या अंडर 16 स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना सर्वात जास्त विकेट्स घेतल्या. या कामगिरीनंतर न्यू साऊथ वेल्स आणि टस्मानिया या ऑस्ट्रेलियातील दोन टीमनी त्याच्याशी करार करण्यासाठी संपर्क साधला होता. निवेतननं त्यांच्यामधील टस्मानिया टीमची निवड केली.

दोन्ही हातानं बॉलिंग करू शकणाऱ्या मराठी बॉलरनं केला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व ओव्हर्स टाकल्या मेडन!

दोन्ही हाताने बॉलिंग

क्रिकेटमध्ये मिळणारी कोणतीही संधी दोन्ही हाताने मिळवण्यासाठीच त्याने दोन्ही हाताने बॉलिंग सुरू केली. तो उजव्या आणि डाव्या हाताने ऑफ स्पिन बॉलिंग करू शकतो. मात्र त्याने क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात फास्ट बॉलर म्हणून केली होती.

निवेतन सुरुवातीला उजव्या हाताने बॉलिंग करत असे, पण वडिलांच्या सल्ल्यानंतर डाव्या हाताने देखील त्याने बॉलिंग करण्यास सुरूवात केली. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्याने दोन्ही हाताने बॉलिंगचा सराव केला. त्यानंतर पुढच्या वयोगटातील स्पर्धांमध्ये, कोचिंगमध्ये त्याचा हा सराव अधिक घट्ट झाला.

आणखी एका भारतीयाचा समावेश

निवेतन राधाकृष्णन (Nivetan Radhakrishnan) हा U19 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवडला गेलेला एकमेव भारतीय वंशाचा खेळाडू नाही. हरकीरत बावजा या भारतीय वंशाच्या खेळाडूची देखील ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली आहे. हरकीरत देखील निवेतन प्रमाणे ऑफ स्पिनर असून ऑस्ट्रेलियाच्या अंडर 16 टीममध्ये खेळून वर्ल्ड कप टीममध्ये दाखल झाला आहे.

ऑस्ट्रेलियाला 2010 नंतर एकदाही T20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यांची या स्पर्धेतील पहिली मॅच यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध 14 जानेवारी रोजी होणार आहे.

ऑस्ट्रेलियन स्पिनरची जादू, कॅप्टनच्या मोठ्या चुकीनंतरही जिंकून दिली थरारक मॅच!

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: