
ऋषभ पंत (Rishabh Pant) हे नाव सध्या क्रिकेटच्या मैदानात सतत गाजत आहे. ऑस्ट्रेलिया सीरिजमधील शेवटच्या दोन टेस्टमध्ये पंतचा योगदान महत्त्वाचं होतं. सिडनीमध्ये (Sydney Test) त्याच्या खेळामुळेच भारतानं मॅच वाचवली. ब्रिस्बेनमध्येही (Brisbane Test) तो शेवटपर्यंत उभा होता म्हणून ऑस्ट्रेलिया त्यांच्या सर्वात सुरक्षित मैदानात तब्बल 32 वर्षांनी हरली. इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई टेस्टमध्येही (Chennai Test) त्यानं पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून सर्वात जास्त रन काढले. त्याच्या प्रत्येक अपयशावर टपलेल्या मंडळींना टपली मारत पंत अधिक जोमानं खेळत आहे.
.. म्हणून पंतचा अभिमान वाटेल
ऋषभ पंतच्या खेळावर मॅचमधील परिस्थितीचा फरक पडत नाही. मैदानावर नैसर्गिक वावरणारा पंत हा मैदानाबाहेर नेहमीच संवेदनशील आहे. प्रत्येक सीरिजनंतर तो मॅचचं किट गरजू खेळाडूला देत असतो. आता पंतच्या राज्यात उत्तराखंड (Uttarakhand) मधील चमोली (Chamoli ) जिल्ह्यात हिमकडा कोसळून मोठं नुकसान झालं आहे. या जलप्रयात मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या अनेकांची सुटका करण्यात आली आहे. तसंच तिथं मदतकार्य मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे.
उत्तराखंड (Uttarakhand) मधील नागरिकांच्या व्यथा सांगणाऱ्या बातम्या पाहून देशाच्या दुसऱ्या टोकाला चेन्नईत टेस्ट खेळणारा पंत व्यथित झाला आहे. त्यानं ट्विट करत ही व्यथा सर्वांसमोर मांडली आहे. त्याचबरोबर त्यानं आपला निर्णय देखील जाहीर केला आहे.
( वाचा : फक्त एका रुपयात मिळणार भरपेट जेवण, भारताच्या माजी क्रिकेटपटूने सुरु केली ‘जन रसोई’ )
काय आहे निर्णय?
‘उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये हिमकडा कोसळल्यानं मृत्यू झालेल्यांबद्दल मी दु:खी आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या बचावपथकासाठी मी मॅच फिस दान देण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त लोकांनी या कामी मदत करण्यासाठी पुढं यावं असं मी आवाहन करत आहे.’ असं ट्विट पंतनं केलं आहे.
भारतीय क्रिकेटपटूला एका मॅचची फिस म्हणून 15 लाख रुपये मिळतात ती मॅच फिस पंत उत्तराखंडातील बचावपथकाला देणार आहे. यापूर्वी देखील त्यानं एक ट्विट करत उत्तराखंडमधील घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता.
सध्या दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असलेला ऋषभ पंत हा मुळचा उत्तराखंडमधील हरिद्वारचा आहे. त्याचा जन्म तिथेच झाला. त्याचे कुटुंबीय देखील उत्तराखंडचे आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात रविवारी सकाळी हिमकडा कोसळून महापूर आला होता. या महापुरात ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. तर, शेकडो कर्मचारी विविध ठिकाणी अडकले आहेत. यापैकी अनेकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी ही बातमी लिहित असताना 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.