फोटो – ट्विटर, बीसीसीआय

प्रतिकूल परिस्थितीवर गुणवत्तेच्या जोरावर मात करणारी अनेक उदाहरणं भारतीय क्रिकेटमध्ये आहेत. आयपीएल स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेटमध्ये पैसा आला. या पैशांचा फायदा या क्रिकेटपटूंनाही झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, तीव्र स्पर्धा आणि कमी जागा यामुळे हे स्वप्न सर्वांचं पूर्ण होतं असं नाही. अशा सर्व क्रिकेट वर्तुळातील गुणवान मुलांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम आयपीएलनं केलं आहे. उत्तर प्रदेशकडून (Uttar Pradesh) देशांतर्गत क्रिकेट आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) आयपीएल स्पर्धा खेळलेल्या रिंकू सिंहची गोष्ट (Rinku Singh Story) ही प्रतिकुल परिस्थितीवर मात करणाऱ्या क्रिकेटपटूची आहे.

‘तो’ दिवस खास

8 एप्रिल 2018 हा दिवस रिंकूसाठी खास होता. त्या दिवशी रिंकूने कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये जन्मलेला रिंकू अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आयपीएल क्रिकेटपर्यंत पोहचला होता.

रिंकूचे वडील चंद्रसिंह घर चालवण्यासाठी सायकलवर लोकांच्या घरोघरी सिलेंडर डिलिव्हरी करण्याचं काम करत. त्याचा एक भाऊ ऑटो चालवत होता. तर एक कोचिंग क्लासमध्ये चपराशी होता. फक्त 12 हजार रूपयात घरातील 7 जणांचा खर्च भागवण्याची कसरत त्याच्या कुटुंबीयांना करावी लागत असे.

या सर्व प्रतिकुल परिस्थितीतही रिंकूने क्रिकेटचे पॅशन (Rinku Singh Story) जपले. त्याला घरच्यांनीही साथ दिली. त्यामुळे तो अगदी अंडर 16 पासून उत्तर प्रदेशातील क्रिकेट गाजवत होता. त्याला 2017 साली किंग्ज इलेव्हन पंजाब (तेव्हाचे नाव) टीमनं खरेदी केलं. पण, एकही मॅच खेळण्याची संधी दिली नाही. त्यानंतर पुढील आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं 80 लाखांची बोली लावत खरेदी केलं.

टॅम्पो ड्रायव्हर वडील अंथरुणाला खिळलेले, भावानं केली आत्महत्या, जिद्दी चेतननं पहिल्याच मॅचमध्ये गाजवलं मैदान!

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका

रिंकूला केकेआरनं आजवर मर्यादीत संधी दिली आहे. त्या संधीचा त्याला मोठा फायदा उठवता आला नाही. यावर्षीच्या सिझनमध्ये (IPL 2021) तर तो दुखापतीमुळे बाहेरच होता. पण, उत्तर प्रदेशकडून खेळताना त्याने सातत्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे.

2019 साली झालेल्या रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशची अवस्था 4 आऊट 54 अशी झाली होती. त्यावेळी सौराष्ट्रविरुद्धची बाजी पलटवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या टीमला विशेष कामगिरीची गरज होती. टीमची ती गरज रिंकूने पूर्ण केली. त्याने 181 बॉलमध्ये 150 रन काढले. उत्तर प्रदेशच्या त्या इनिंगमधील 385 पैकी 150 रन एकट्या रिंकूने काढले होते. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रिंकूची सरासरी 60.81 आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 50.50  इतकी (Rinku Singh Story) आहे.

विजय हजारे ट्रॉफीत धमाका

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) रिंकूनं उत्तर प्रदेशकडून सर्वाधिक 379 रन काढले आहेत. त्याने 6 इनिंगमध्ये 94.75 च्या सरासरीनं हे रन केले आहेत. 65, 104, 1*, 75, 58* आणि 76 असे 6 इनिंगमध्ये रिंकूनं रन केले. त्याच्या जोरदार प्रयत्नानंतरही उत्तर प्रदेशचं आव्हान क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आले. पण आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी (IPL Mega Auction 2022) केलेल्या या खेळानं तो सर्व टीमच्या रडावर आला असून यंदा मालामाल होणार (Rinku Singh Story) हे नक्की आहे.

युवराज सिंहला शिष्यानं दिली वाढदिवसाची भेट, 17 फोर आणि 9 सिक्ससह काढले 169 रन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: