फोटो – ट्विटर

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) यंदा इतिहास घडला आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh)  या उत्तर भारतामधील छोट्याशा राज्याच्या टीमनं सर्व दिग्गज टीमना बाजूला सारत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. हिमाचलनं देशांतर्गत स्पर्धेत पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धचं विजेतेपद पटकावलं. आपल्या राज्यातील फक्त ग्राऊंड सुंदर नाहीत, तर टीमचा खेळही तितकाच सुंदर आहे, हे हिमाचलनं यंदा दाखवून दिले. हिमाचलच्या या विजेतेपदात कॅप्टन ऋषी धवनचा (Rishi Dhawan Performance) मोठा वाटा आहे.

कॅप्टन असावा तर असा…

ऋषी धवननं या स्पर्धेतील 8 मॅचमध्ये 76.73 च्या सरासरीनं 458 रन केले. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. संपूर्ण स्पर्धेत मिडल ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या धवननं नेहमीच टीमचा रनरेट कसा वाढेल याची काळजी घेतली. त्याचा 127.22 हा त्याचा स्ट्राईक त्याची साक्ष आहे.

विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर स्ट्राईक रेटमध्ये टॉप 5 बॅटरमध्ये तो पहिल्या क्रमांकावर असून टॉप 20 बॅटर्सच्या यादीत त्याच्यापेक्षा फक्त एक जण (व्यंकेटश अय्यर) पुढे आहे.

ऋषी धवन सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत देखील दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 8 मॅचमध्ये 6 च्या इकोनॉमी रेटनं 17 विकेट्स घेतल्या आहेत. ही सर्व कामगिरी (Rishi Dhawan Performance) त्यानं कॅप्टनशिपचं ओझं सांभाळून केली आहे. टीमचा अनुभवी खेळाडू, कॅप्टन कसा असावा याचं उदाहरण धवननं या स्पर्धेत दाखवून दिलं आहे.

8 वी मॅच खेळणाऱ्या खेळाडूचा तामिळनाडूला धक्का, हिमाचल प्रदेशनं पटकावले विजेतेपद

15 वर्षांचा प्रवास

ओपनिंग बॅटर म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केलेल्या ऋषी धवननं फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर म्हणून आता टीममध्ये जागा मिळवली आहे. धर्मशालाच्या बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर कटर आणि स्लो व्हेरिएशनच्या माध्यमातून बॉलिंग करत त्याने हे नाव कमावले आहे.

सध्या 31 वर्षांच्या असलेल्या धवननं वयाच्या 16 व्या वर्षी हिमाचलकडून कुचबिहार ट्रॉफी स्पर्धेत खेळताना सर्वांचे लक्ष वेधले. त्याने त्या स्पर्धेत रेल्वेविरुद्ध 340 रनची खेळी केली होती. तीन वर्षानंतर त्याची हिमाचलच्या फर्स्ट क्लास क्रिकेट टीममध्ये निवड झाली. रणजी ट्रॉफी स्पर्धेत धवनचा बॉलर म्हणून उदय झाला. 2013-14 च्या रणजी सिझनमध्ये त्याने सर्वाधिक 49 विकेट्स (Rishi Dhawan Performance) घेतल्या.

टीम इंडिया आणि IPL

ऋषी धवनची 2014 साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या इंडिया A टीममध्ये निवड झाली. त्या दौऱ्यातील फायनलमध्ये त्याने सातव्या क्रमांकावर येत 56 रनची खेळी केली. त्यामुळे भारतीय टीमला विजेतेपद मिळवता आले. या अनुभवाच्या जोरावर 2016 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टीम इंडियात धवनचा समावेश झाला. त्या दौऱ्यात तो 3 वन-डे खेळला, पण त्यामध्ये त्याला फक्त 1 विकेट मिळाली. त्याचवर्षी झिम्बाब्वे दौऱ्यावर 1 T20 मॅच देखील धवन खेळला आहे.

ऋषी धवनची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीप्रमाणेच आयपीएल कारकिर्द देखील साधारण राहिली आहे. तो 2012 ते 16 या कालावधीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या टीमचा सदस्य होता. या टीमनं नेहमीच स्टँडबाय बॉलर म्हणून त्याचा उपयोग केला आहे.

युवराजला शिष्यानं दिली वाढदिवसाची भेट, 17 फोर आणि 9 सिक्ससह काढले 169 रन

धवननं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 24 मॅचमध्ये फक्त 18 विकेट्स घेतल्या आहेत. 2016 नंतर त्याची एकाही आयपीएल टीमनं निवड केलेली नाही. या विजय हजारे स्पर्धेत त्यानं बॉल आणि बॅटनं केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे (Rishi Dhawan Performance) आयपीएल टीम्सना त्याच्यासाठी दरवाजे उघडावे लागणार आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: