फोटो – ट्विटर, बीसीसीआय

हिमाचल प्रदेशनं (Himachal Pradesh)  विजय हजारे ट्रॉफीची (Vijay Hazare Trophy) फायनल गाठून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. पण, फायनलमध्ये या टीमची लढत लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या तामिळनाडूशी (Tamil Nadu) होती. या फायनलमध्ये हिमाचल धक्कादायक निकाल नोंदवेल अशी अपेक्षा कमी जणांची होती. त्यातही टार्गेट 300 पेक्षा जास्त होते. स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेला बॅटर 10 ओव्हर्सच्या आत आऊट झाला होता. त्यानंतरही फक्त 8 वी लिस्ट A मॅच खेळणाऱ्या खेळाडूच्या नाबाद सेंच्युरीच्या जोरावर ‘हिमाचल’नं विजय हजारे स्पर्धेच्या  विजेतेपदाचा (Himachal Pradesh Champion) गौरीशंकर सर केला आहे.

कसं झालं शक्य?

जयपूरमध्ये झालेल्या या फायनलमध्ये हिमाचल प्रदेशनं VJD पद्धतीनं विजेतेपद पटकावले. हिमाचलला विजेतेपदासाठी 50 ओव्हर्समध्ये 315 रनचं टार्गेत होतं. त्याचा पाठलाग करताना हिमाचलनं 47.3 ओव्हर्समध्ये 4 आऊट 299 रन केले होते. त्यावेळी अंधार पडल्यानं VJD पद्धतीचा वापर करत हिमाचल प्रदेशला 11 रननं विजयी घोषित करण्यात आले.

315 रनचा पाठलाग करताना हिमाचलनं सुरूवात आक्रमक केली होती. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या प्रशांत चोप्रानं (Prashant Chopra) फायनलमध्येही आत्मविश्वासानं खेळला. हिमाचलनं 9 ओव्हर्सच्या आत 60 रन पूर्ण केले होते. त्यावेळी प्रशांत आऊट झाला. पाठोपाठ दिग्विजय गांगी (0) आणि निखिल गांगटा (18) रन काढून आऊट झाले. त्यावेळी हिमाचलचा स्कोअर 3 आऊट 96 होता.

जुळ्या भावांनी सावरलं, टीम इंडियाच्या ऑल राऊंडरचा ‘सुंदर’ टच, थरारक लढतीचा शेवटच्या बॉलवर लागला निकाल

8 व्या मॅचमध्ये कमाल

हिमाचलच्या तीन विकेट्स एकापाठोपाठ गेल्यानंतरही ओपनर शुभम अरोरा (Shubham Arora) एका बाजूनं उभा होता. शुभमच्या लिस्ट A  कारकिर्दीमधील ही 8 वी मॅच होती. त्यानं या मॅचपूर्वी फक्त 1 हाफ सेंच्युरी झळकावली होती. पण तो या फायनलमध्ये हिमाचल प्रदेश क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय खेळी खेळला.

शुभमनं अमित कुमारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 148 रनची पार्टनरशिप केली. या जोडीनं हिमाचलचा रनरेट 6 पेक्षा कमी होऊ दिला नाही. त्यांनी घेतलेली ही खबरदारीच अखेर VJT मेथडमध्ये हिमाचलसाठी उपयोगी (Himachal Pradesh Champion) ठरली.

शुभम अरोराची अविस्मरणीय सेंच्युरी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शुभमनं 95 बॉलमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील पहिली लिस्ट A सेंच्युरी पूर्ण केली. अमित कुमार आऊट झाल्यानंतर कॅप्टन ऋषी धवनसह त्याने आणखी पडझड होऊ न देता हिमाचलच्या हातातून रनरेट आणि विजेतेपद निसटणार नाही, याची काळजी घेतली.

शुभमनं 131 बॉलमध्ये 13 फोर आणि 1 सिक्ससह नाबाद 136 रन काढले. तर पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेणाऱ्या ऋषी धवननं 23 बॉलमध्ये नाबाद 42 रन काढले. या संपूर्ण स्पर्धेत ऋषी धवनने 458 आणि प्रशांत चोप्राने 456 रन काढले. सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत हिमाचलचे हे दोघे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण खेळाचा या विजेतेपदात (Himachal Pradesh Champion) मोठा वाटा आहे.

तामिळनाडूचे अजब डावेपेच

यापूर्वी तामिळनाडूनं अजब डावपेच खेळत 49.4 ओव्हर्समध्ये 314 रन काढले. तामिळनाडूची सुरुवात खराब झाली होती. त्यावेळी नवा बॉल खेळून काढण्यासाठी त्यांनी चक्क साई किशोर आणि एम. अश्विन या बॉलर्सना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर पाठवले. त्यांची ही चाल यशस्वी ठरली नाही. 15 व्या ओव्हरमध्ये तामिळनाडूची अवस्था 4 आऊट 40 होती.

अनुभवी दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) टीमसा संकटातून बाहेर काढले. त्याने बाबा इंद्रजीतसोबत 5 व्या विकेटसाठी 202 रनची पार्टनरशिप केली. कार्तिकनं 116 रन काढले. शाहरूख खाननं (Shahrukh Khan) त्याच्या स्टाईलनं फटकेबाजी करत 21 बॉलमध्ये 42 रन काढले. त्यामुळे तामिळनाडूनं 300 रनचा टप्पा ओलांडला. पण, जिद्दी हिमाचल प्रदेशच्या टीमनं हे टार्गेट पूर्ण करत बलाढ्य तामिळनाडूला धक्का (Himachal Pradesh Champion) दिला.

‘सिलेंडर डिलिव्हरी मॅन’च्या मुलाची कमाल, IPL Auction मध्ये होणार मालामाल

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: