फोटो – ट्विटर/@IamShivamDube

संपूर्ण भरात असलेला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि आदित्य तरे (Aditya Tare) याची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी याच्या जोरावर मुंबईने (Mumbai) विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) चौथ्यांदा जिंकली आहे. उत्तर प्रदेशनं (Uttar Pradesh) पहिल्यांदा बॅटींग करत मुंबई समोर 313 रनचं आव्हान ठेवलं. पण मुंबईनं हे आव्हान 6 विकेट्स आणि 51 बॉल राखत पूर्ण केले.

पृथ्वीचा पॉवर गेम

मुंबईला फायनलममध्ये 313 रनचं टार्गेट मिळाले होते. फायनल मॅचमध्ये उत्तर प्रदेशच्या शिस्तबद्ध बॉलिंग अटॅक समोर हे नक्कीच आव्हानात्मक टार्गेट होते त्यावेळी पृथ्वी शॉ ने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत मोठ्या टार्गेटचा पाठलाग सोपा करुन टाकला. पृथ्वी या स्पर्धेत तुफान फॉर्मात होता. त्याने एका विजय हजारे ट्रॉफीच्या सिझनमध्ये सर्वात जास्त 827 रन करण्याचा विक्रम केला.

त्याची ही खेळी यापूर्वीसारख्या मोठ्या सेंच्युरीची नव्हती. पण, त्यामुळे उत्तर प्रदेशच्या बॉलर्सचा आत्मविश्वासाला नक्कीच तडा गेला. पृथ्वीने फक्त 39 बॉलमध्ये 73 रन केले. 10 फोर आणि 4 सिक्स मारत त्यांने दिल्लीच्या उकाड्यापेक्षाही उत्तर प्रदेशच्या बॉलर्सला जास्त त्रास दिला.

( वाचा : महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी शॉ चे ‘तांडव’, विक्रमाचा गौरीशंकर सर )

आदित्यची पहिली सेंच्युरी

पृथ्वी शॉ आऊट झाल्यानंतरही मुंबईसाठी विजेतेपद दूर होते. टीममधील सर्वात अनुभवी बॅट्समन म्हणून आदित्य तरेवर मोठी जबाबदारी होती. त्याने ती जबाबदारी चोख पार पाडली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आजवर 12 हाफ सेंच्युरी झळकवणाऱ्या आदित्यची पहिली सेंच्युरी स्पर्धेच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy 2021) योग्य वेळी आली.

माधव कौशिकची सेंच्युरी व्यर्थ

यापूर्वी उत्तर प्रदेशच्या माधव कौशिकनं (Madhav Kaushshik) नाबाद 158 रनची खेळी केली. पहिला रन काढण्यासाठी तब्बल 24 बॉल घेतले. त्याची ही फक्त पाचवी फर्स्ट क्लास मॅच होती. यापूर्वी एकही हाफ सेंच्युरी न झळकावलेल्या माधवने सेट झाल्यावर आक्रमक खेळ केला. त्याने 158 रनच्या खेळीत 15 फोर आणि 4 सिक्स लगावले.

माधव कौशिक आणि आकाश दीप नाथ या जोडीनं शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी केली. उत्तर प्रदेशनं शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 111 रन काढले.

( वाचा : सुरेश रैनानं सांगितलं IPL मधील माघारीचं कारण, पबमधील ‘त्या’रात्रीबाबतही दिलं स्पष्टीकरण! )

उत्तर प्रदेशनं 2004-5 ची फायनल टाय झाल्यानं तामिळनाडू सोबत संयुक्त विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांना एकट्यानं विजेतपद(Vijay Hazare Trophy 2021)  मिळवण्याची संधी माधव कौशिकच्या खेळानं निर्माण झाली होती. मात्र, आधी पृथ्वी आणि नंतर आदित्य तरेच्या दमदार खेळामुळे त्यांची संपूर्ण विजेतेपदाची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: