फोटो – ट्विटर/@BCCIdomestic

कोरोना व्हायरसच्या काळात क्रिकेट खेळण्याचे नियम बदलले आहेत. प्रत्येक क्रिकेटपटूसाठी ‘बायो बबल’ हे एक अनिवार्य बंधन आता लागू झालं आहे. हे बायो बबल त्रासदायक असल्याच्या तक्रारी काही क्रिकेटपटूंनी यापूर्वीही केल्या आहेत. काही जण यामधूनही मार्ग काढत आहेत. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur Mumbai) हा त्यापैकी एक. टीम इंडियाचा सदस्य असलेल्या शार्दुलला दुसऱ्या टेस्टनंतर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर बायो बबलमध्ये राहण्यासाठी शार्दुलनं अहमदाबाद ते जयपूर हा 700 किलो मीटरचा प्रवास कारनं केला होता.

जयपूरला इतका प्रवास करुन विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) खेळण्यासाठी शार्दुल आला. या सर्व कष्टाचं शार्दुलनं चीज केलं आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विरुद्धच्या लढतीमध्ये मुंबईची अवस्था 5 आऊट 148 अशी असताना शार्दुल मैदानात उतरला होता.

12 बॉलमध्ये 60 रन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India tour of Australia) अवघड परिस्थितीमध्ये शार्दुलनं ब्रिस्बेनचं मैदान मारलं होतं. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅटींगला आलेल्या शार्दुलनं ब्रिस्बेनमध्ये 69 रन काढले होते. या खेळीनं शार्दुलचा आत्मविश्वास वाढला आहे. हिमाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीमध्येही तो आत्मविश्वास दिसला.

( वाचा : असा घडला ब्रिस्बेन टेस्टचा हिरो ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर )

शार्दुलनं अनुभवी आदित्य तरे (Aditya Tare) सोबत सहाव्या विकेटसाठी 112 रनची भागिदारी केली. आदित्य 45 व्या ओव्हरमध्ये 83 रन काढून आऊट झाला तेंव्हा मुंबईचा स्कोअर 6 आऊट 260 होता.

शेवटच्या पाच ओव्हरमध्ये शार्दुलनं फटकेबाजी करत मुंबईला 321 रनचा टप्पा गाठून दिला. शार्दुलनं 52 बॉलमध्ये 92 रन काढले. यामध्ये 6 फोर आणि 6 सिक्सचा समावेश आहे. याचाच अर्थ शार्दुलनं फक्त 12 बॉलमध्येच मुंबईसाठी 60 रनचं (Shardul Thakur Mumbai) योगदान दिलं. विशेष म्हणजे A श्रेणी क्रिकेटमधील शार्दुलची ही पहिलीच हाफ सेंच्युरी आहे.

मुंबईची बाद फेरीत धडक

हिमाचल प्रदेशला 322 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांची टीम निर्धारीत 50 पैकी अर्ध्या ओव्हर्सही खेळू शकली नाही. हिमचालची टीम 24.1 ओव्हरमध्ये फक्त 121 रनवर ऑल ऑऊट झाली. मुंबईनं 200 रननं दणदणीत मॅच जिंकली.

( वाचा : कडक! फक्त 8.5 ओव्हर्समध्ये 149 चं टार्गेट पूर्ण, उथप्पाने लगावले 10 सिक्स )

या विजयासह मुंबईनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या बाद फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला आहे. मुंबईनं गट साखळीतील सर्व पाच मॅच जिंकल्या आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, पुदुच्चेरी आणि हिमाचल प्रदेश या पाच टीमना मुंबईनं पराभूत केले आहे.

बाद फेरीत कुणी केला प्रवेश?

विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत मुंबईसह केरळ, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सौराष्ट्र, उत्तराखंड आणि दिल्ली या आठ टीमनं प्रवेश केला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading