
अंडर 19 स्पर्धेत खेळत असल्यापासून आपल्याला देशाचं उज्ज्वल भविष्य का म्हंटले जात होते हे पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy 2021) दाखवून दिले आहे. कर्नाटक विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये (Mumbai vs Karnataka) पृथ्वीने 165 रनची खेळी केली. मुंबईच्या एकूण 322 रनपैकी अर्ध्याहून अधिक रन पृथ्वीने काढले. त्याच्या या सेंच्युरीच्या जोरावर मुंबईने कर्नाटकचा 72 रनने पराभव करत स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये मुंबईची लढत उत्तर प्रदेशशी होणार आहे. या विजयाबरोबरच पृथ्वीने अनेक नव्या रेकॉर्डर्सचीही (Prithvi Shaw Record) नोंद केली आहे.
577 ची सरासरी!
पृथ्वी शॉ ने या स्पर्धेत एक डबल सेंच्युरी आणि तीन सेंच्युरी आहेत. त्यापैकी एक डबल सेंच्युरी आणि दोन सेंच्युरी त्याने मुंबईची कॅप्टनसी करताना झळकावल्या आहेत. पृथ्वीच्या नेतृत्वाखालीच भारताने 2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप (U19 World Cup 2008) जिंकला होता.
त्यानंतर विजय हजारे स्पर्धेतही पृथ्वीने त्याला कॅप्टनसी मानवते हे दाखवले आहे. पृथ्वीने या स्पर्धेत तीन मॅचमध्ये कॅप्टनसी केली असून त्यामध्ये त्याने 577 रन केले आहेत. या तीनपैकी तो फक्त एकदा सेमी फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध आऊट झाला आहे. त्यामुळे त्याची विजय हजारे स्पर्धेत कॅप्टन म्हणून तब्बल 577 सरासरी (Prithvi Shaw Record) आहे.
( VIDEO : आमिर सोहेलनं सुरु केलं, व्यंकटेशन प्रसादनं संपवलं! ऐतिहासिक घटनेची 25 वर्षे )
सर्वाधिक रनचा रेकॉर्ड
मुंबई विरुद्ध कर्नाटक ही या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करणाऱ्या टीममधील मॅच पृथ्वी शॉ साठी खास ठरली. कर्नाटकच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि आदित्य तरे झटपट आऊट झाले. पण त्याचा पृथ्वीवर परिणाम झाला नाही.
दोन विकेट्स झटपट जाऊनही मॅचवर मुंबईचं वर्चस्व कायम होते. त्याने पहिले 50 रन करण्यासाठी 48 बॉल घेतले. पण त्यानंतर पुढचे 50 फक्त 31 बॉलमध्ये पूर्ण केले. पृथ्वीने 79 बॉलमध्ये 12 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने सेंच्युरी पूर्ण केली.
सेंच्युरीनंतरही पृथ्वीची एक्स्प्रेस सुसाट होती. त्याने 150 चा टप्पाही सहज पार केला. तो आणखी एक डबल सेंच्युरी झळकावेल असे वाटत असतानाच 165 रनवर तो आऊट झाला. पण तो पर्यंत मुंबईची स्थिती भक्कम झाली होती.
पृथ्वी शॉ ने कर्नाटक विरुद्ध खेळताना कर्नाटकच्याच मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याचा विजय हजारे ट्रॉफीच्या एका सिझनमध्ये सर्वाधिक 723 रनचा रेकॉर्ड (Prithvi Shaw Record) देखील मोडला. पृथ्वीने सध्या या स्पर्धेतील 7 मॅचमध्ये 188.50 इतक्या भक्कम सरासरीने 754 रन केले आहेत.
कर्नाटकचा पराभव
कर्नाटकच्या ओपनिंग जोडीचा फॉर्म पाहता 323 रनचे टार्गेट अवघड नव्हते. पण मुंबईच्या बॉलर्सनी सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध मारा करत कर्नाटकला वरचढ होऊ दिले नाही. कर्नाटककडून देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) सर्वात जास्त 64 रन काढले.
कर्नाटकच्या या 20 वर्षाच्या तरुण ओपनरसाठी ही स्पर्धा चांगलीच यशस्वी ठरली. त्याने देखील या मॅचमध्ये मयंक अग्रवालचा रेकॉर्ड मागे टाकला. देवदत्तने या स्पर्धेत 7 मॅचमध्ये 147.40 च्या सरासरीने 737 रन काढले आहेत.
( वाचा : 20 वर्षाच्या पोरानं झळकावली सलग तिसरी सेंच्युरी, टीम इंडियाच्या दारावर केली टकटक )
देवदत्तला अन्य बॅट्समनची साथ मिळाली नाही. त्यामुळे कर्नाटकची संपूर्ण इनिंग 42. 4 ओव्हर्समध्ये 250 रनवरच आटोपली.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.