फोटो – ट्विटर, अभिषेक शर्मा

टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) याचा आज (12 डिसेंबर) वाढदिवस आहे. भारतीय टीमला वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराजची आक्रमक बॅटींग आणि उपयुक्त बॉलिंग निर्णायक ठरली होती. भारतीय क्रिकेटमध्ये युवराज सिंहचा शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या अभिषेक शर्माने युवराजच्या वाढदिवशी दमदार 169 रनची (Abhishek Sharma 169) खेळी करत त्याच्या गुरूला वाढदिवसाची भेट दिली आहे.

17 फोर आणि 9 सिक्स!

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2021) पंजाब विरुद्ध सेनादल (Punjab vs Services) या मॅचमध्ये अभिषेकनं ही कमाल केली. सेनादलाने या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 आऊट 260 रन केले. 261 रनचा पाठलाग ओपनिंगला आलेल्या अभिषेकनं अगदीच एकतर्फी केला.

अभिषेकनं 117 बॉलमध्ये 17 फोर आणि 9 सिक्ससह नाबद 169 रन (Abhishek Sharma 169)  काढले. आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्जकडून खेळलेल्या प्रबसिमरन सिंग (Prabhsimran Singh) याने अभिषेकला चांगली साथ दिली. त्याने 72 रन काढले. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 192 रनची पार्टनरशिप केली. प्रबसिमरन आऊट झाल्यानंतर अभिषेकनं रमनदीप सिंगच्या मदतीनं 261 रनचे टार्गेट फक्त 37.5 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. अभिषेकनं त्यापूर्वी 3 ओव्हर्समध्ये 25 रन देत 1 विकेटही घेतली होती.

प्रभ‘सिमरन’च्या जबरदस्त फॉर्ममुळे पंजाबचं ‘राज’ कायम!

पंजाबचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. पहिल्या मॅचमध्ये राजस्थानकडून पराभूत झाल्यानंतर पंजाबने कमबॅक करत सलग तीन विजय मिळवले आहेत. या विजयात अभिषेचा वाटा मोलाचा आहे. त्याने आजवर 4 मॅचमध्ये 128 च्या सरासरीनं 256 रन केले आहेत. यामध्ये 31 फोर आणि 10 सिक्सचा समावेश आहे.

युवराजचा शिष्य

युवराजच्या पंजाब राज्यातूनच अंडर 19 स्पर्धेतून अभिषेक पुढे आला. तो देखील डावखुरा बॅटर आणि स्पिनर असल्यानं त्याची तुलना युवराजशी करण्यात येते. युवराजनेही त्याला आजवर अनेकदा नेटमध्ये क्रिकेटचे मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

विनू मंकड स्पर्धेच पंजाबच्या अंडर 19 टीमकडून अभिषेकने पदार्पणातील मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर तो 2016 साली झालेल्या अंडर 19 स्पर्धेत टीम इंडियाचा कॅप्टन होता. 2018 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यापूर्वीच अभिषेकनं पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते.

पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने 2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. या टीमचा अभिषेक महत्त्वाचा प्लेयर होता. त्यानं त्या स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशविरुद्ध महत्त्वाची हाफ सेंच्युरी झळकावली होती. त्याचबरोबर लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंगच्या जोरावर 9 विकेट्स घेतल्या होत्या.

अभिषेकला 2018 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स (तेव्हाचे नाव) टीमनं खरेदी केले. या टीमने स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात अभिषेकला संधी दिली. आयपीएल पदार्पणातील मॅचमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) त्याने 19 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली होती. आयपीएल 2019 मध्ये शिखर धवनच्या बदल्यात दिल्लीने जे 3 खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) टीमला दिले, त्यामध्ये अभिषेकचा समावेश (Abhishek Sharma 169) होता.

‘… म्हणूनच युवराजला मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करता आला’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: