फोटो – ट्विटर

तामिळनाडू आणि कर्नाटक (Tamil Nadu vs Karnataka) या दोन क्रिकेट टीममध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये कट्टर स्पर्धा आहे. महिनाभरापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) स्पर्धेच्या फायनलमध्ये या टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळल्या होत्या. त्या फायनलमध्ये तामिळनाडूच्या शाहरूख खाननं (Shahrukh Khan) शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत टीमला विजेतेपद मिळवून दिले. आता विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) क्वार्टर फायनलमध्ये शाहरूखच्या आणखी एका सुपरहिट शोमुळे (Shahrukh Khan Superhit Show) तामिळनाडूनं कर्नाटकचा 151 रननं दणदणीत पराभव केला आहे.

जोरदार सुरूवात

जयपूरमध्ये झालेल्या या मॅचमध्ये कर्नाटकचा कॅप्टन मनिष पांडेने (Manish Pandey) टॉस जिंकत पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. या मॅचमध्ये तामिळनाडूनं तिसऱ्या क्रमांकावर साई किशोरला पाठवण्याची चाल खेळली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एकही हाफ सेंच्युरी नसलेल्या साईला दिनेश कार्तिक, विजय शंकर, शाहरूख खान आणि वॉशिंग्टन सुंदर या सर्वांच्या आधी बॅटींगला पाठवण्यात आले.

साई किशोरनं मॅनेजमेंटचा हा विश्वास सार्थ ठरवला. त्याने सीएसके (CSK) टीममधील त्याचा पार्टनर नारायण जगदीशनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 147 रनची पार्टनरशिप केली. साईनं यावेळी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. त्याने 4 फोर आणि 3 सिक्ससह 61 रन काढले. तर, जगदीशननं त्याचा यावर्षीचा फॉर्म कायम राखत लिस्ट A क्रिकेटमधील तिसरी सेंच्युरी झळकावली. जगदीशन 101 बॉलमध्ये 102 रन काढून आऊट झाला.

8 इनिंगमध्ये 624 रन काढूनही वर्ल्ड कपसाठी दुर्लक्ष, IPL 2022 मध्ये कोटींच्या उड्डाणासाठी सज्ज

शाहरूख शो

जगदीशन-साई जोडीनं मोठ्या स्कोअरची पायाभरणी केली होती. त्यानंतर दिनेश कार्तिक (37 बॉल 44) आणि बाबा इंद्रजीत (24 बॉल 31) यांनी उपयुक्त खेळी करत रनरेट चांगला राहील याची खबरदारी केली. त्यामुळे शाहरुख खानला मनसोक्त फटकेबाजी (Shahrukh Khan Superhit Show) करण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार झाला होता.

शाहरूखनं कर्नाटकला पुन्हा एकदा त्याच्या पॉवर हिटींगचा तडाखा दिला. या वादळी खेळीची सुरूवात त्याने शांतपणे केली. तो पहिल्या 14 बॉलनंतर फक्त 17 रन काढून खेळत होता. त्यानंतर पुढच्या 25 बॉलमध्ये त्याने 62 रन काढले. या खेळीत शाहरूखने 7 फोर आणि 6 सिक्स लगावले. याचाच अर्थ त्याने फक्त 13 बॉलमध्ये 64 रन काढले. शाहरूख 39 बॉलमध्ये 79 रनवर नाबाद राहिला. त्याने 202.56 च्या स्ट्राईक रेटनं केलेल्या फटकेबाजीमुळे तामिळनाडूनं शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये 102 रन केले.

कर्नाटकचा मोठा पराभव

कर्नाटकला विजय हजारे स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी 50 ओव्हर्समध्ये 355 रनचे आव्हान होते. या मोठ्या रनचा पाठलाग करताना कर्नाटकची टीम संपूर्ण इनिंगमध्ये कधीही मॅचमध्ये नव्हती. देवदत्त पडिक्कल शून्यावर आऊट झाला. त्यानंतर कर्नाटकच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत गेल्या.

कर्नाटकला पूर्ण 50 सोडा 40 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. त्यांची संपूर्ण इनिंग 39 ओव्हर्समध्ये 203 रनवर आटोपली. या मोठ्या विजयासह (Shahrukh Khan Superhit Show) तामिळनाडूनं स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: